Read Your Detailed Horoscope For Today : 8 मे शुक्रवार रोजी आज चंद्राचे गोचर मकर राशीत होणार असून यामुळे आधि योग निर्माण होईल. तसेच आज शुक्रवार असून शुक्राचे गोचर वृषभ राशीत होऊन मालव्य राजयोग देखील बनेल. चंद्र आणि गुरु एक दुसऱ्यांपासून सहा आणि आठव्या भावात असल्याने आधि योग निर्माण होईल. अशातच आज मेष तूळ आणि सहित काही राशींसाठी दिवस भाग्याचा ठरेल.
मेष
मेष राशीच्या लोकांना करिअरमध्ये फायदा होईल. तुमच्या बुद्धिमत्तेचा तुमच्या करिअरमध्ये फायदा होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. आवश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. आज नशिबाची कंपनी मिळेल. नवीन नाती तयार होतील. विवाह जमतील. असाल तुमचा दिवस चांगला जावो.
आज नशीब 89 टक्के तुमच्या पाठीशी आहे. हनुमानजींची पूजा करावी.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी दिवस आनंदाचा असेल. नोकरीत प्रमोशनच्या संधी आहेत. काहीजणांना नवीन नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी दिसू शकतील. वडीलधाऱ्यांच्या आशीर्वाद घ्या. जोडीदाराची साथ प्रत्येक कामात मिळेल. आरोग्य सामान्य असेल. सकारात्मक विचार करा.
आज भाग्य 86 टक्के तुमच्यासोबत असेल. सूर्याला अर्घ्य द्या
मिथुन
व्यक्ती स्वतःसाठी वेळ काढण्यात यशस्वी होतील. नात्यातील दृढ विश्वासामुळे नातेसंबंध सुधारण्यास मदत होईल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ आहे. आज तुम्हाला योग्य उत्पन्न मिळेल. तुम्ही यश आणि कीर्ती मिळवण्यात यशस्वी व्हाल. झटपट यशप्राप्ती करण्यासाठी चुकीची कामे करणे टाळावे. आज भाग्य तुमच्यासोबत 82 टक्के असेल. लक्ष्मी मातेची पूजा करा.
कर्क
कर्क राशीतील व्यक्तींना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळेल. एखाद्या कौटुंबिक सदस्यामुळे तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल. प्रगतीसाठी नवीन मार्गांचा शोध घेण्याची गरज आहे. आज तुम्ही आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी उत्तम संधीचा लाभ घ्याल. प्रॉपर्टी डीलरसाठी आजचा दिवस लाभदायक ठरेल. अनावश्यक खर्चाला आळा घाला. आज भाग्य तुमच्यासोबत 72 टक्के असेल.वरिष्ठ आणि गुरूजनांचे आशीर्वाद घ्या.
सिंह
या राशीतील व्यक्तींनी इतर व्यक्तींचेही म्हणणे ऐकून घेणे गरजेचे आहे. अधिकारी वर्गाशी ओळख वाढवाल. आज तुम्ही इतरांना दिलेले पैसे परत मिळू शकतात. अनावश्यक खर्च करणे टाळा. कामाच्या ठिकाणी तुमच्यासाठी अनुकूल बदल घडून येतील. एखाद्या मोठ्या कार्यक्रमात मित्रांचे सहकार्य लाभेल.
आज भाग्य तुमच्यासोबत 92 टक्के असेल. श्री गणेशाला लाडवांचा नैवेद्य दाखवा.
राज्यपालांच्या निर्णयाने ममता बॅनर्जी सरकार बरखास्त; भाजप सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा
कन्या
व्यक्तींचा दिवस आनंदात जाईल. जाणकार किंवा वरिष्ठ व्यक्तींसोबत काम करण्याची संधी मिळाल्यास अवश्य लाभ घ्यावा. आज व्यापारी वर्गाने विचारपूर्वक काम करण्याची गरज आहे. आर्थिक समस्या कमी होतील. सामाजिक कार्यात एखाद्याला मदत केल्याने तुमचे कौतुक केले जाईल.
आज भाग्य तुमच्यासोबत 84 टक्के असेल.. शिवचालीसा वाचा.
तूळ
व्यक्तींनी राजकारणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. आज तुमच्या मनात नवीन गोष्टी करण्याचा उत्साह असेल. खानपानाशी संबंधित व्यवसाय असणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना आपल्या गुरूकडून सहकार्य लाभेल. एखाद्या व्यक्तीवर गरजेपेक्षा अधिक विश्वास ठेवणे घातक ठरू शकते. आज भाग्य तुमच्यासोबत 85 टक्के असेल. सरस्वती मातेची पूजा करा.
वृश्चिक
व्यक्तींच्या उदारपणामुळे अनेक व्यक्ती प्रभावित होतील. नवीन दागिन्यांची ऑनलाईन खरेदी करण्याची संधी लाभेल. झटपट पैसे कमावण्यासाठी एखाद्या चुकीच्या योजनेत पैसे गुंतवणे टाळा. अभ्यासात तुम्ही उत्तम प्रगती कराल. विवाहित व्यक्तींना अपत्य सुख लाभेल.
आज भाग्य तुमच्यासोबत 95 टक्के असेल. पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करा.
धनु
धनु राशीतील व्यक्तींनी आज आपल्या दैनंदिन दिनचर्येत बदल करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या आवडत्या एखाद्या छंद किंवा कलेत नैपुण्य मिळवण्याचा प्रयत्न करा. आज तुम्ही एखादे नवीन काम करण्याचा विचार कराल. आर्थिक कामात लक्ष घातल्याने मन शांत राहील. दुकानाशी संबंधित चिंता कायम राहतील.
आज भाग्य तुमच्यासोबत 72 टक्के असेल. शिवलिंगावरती दुधाचा अभिषेक करा.
मकर
या राशीतील व्यक्तींनी नव्या उमेदीने आजच्या दिवसाची सुरुवात करावी. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या व्यक्तींची कामे आज अगदी योग्य वेळेत पूर्ण होतील. रियल इस्टेटशी संबंधित व्यक्ती डिस्काउंट देऊ शकतात. आपल्या व्यापारात काही बदल करण्यापूर्वी वरिष्ठ व्यक्तींकडून मार्गदर्शन अवश्य घ्यावे. घरामध्ये नवीन पाहुण्यांच्या आगमनाची सूचना मिळू शकते. आज भाग्य तुमच्यासोबत 85 टक्के असेल. गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवा.
कुंभ
आज तुम्ही बारीकसारीक गोष्टींमुळे चिडचिड करणे टाळायला हवे. एखाद्या विशेष गोष्टीबाबत आज तुमचे मत बदलू शकते. जर तुम्ही ऑनलाईन व्यापार करत असाल तर व्यापार विस्तारासाठी नवीन योजना बनवणे आवश्यक आहे. पूर्वी अर्धवट राहिलेल्या योजनेवर काम करता येईल.
आज भाग्य तुमच्यासोबत 95 टक्के असेल. मुंग्यांना पीठ खाऊ घाला.
मीन
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. तसेच उत्पन्नात वाढ करण्यासाठी अनेक संधी देखील आज मिळू शकतात. सामाजिक स्तरावर नेटवर्किंगचा लाभ मिळेल. कुटुंबामध्ये तुमच्या सकारात्मक वर्तनामुळे लोकं प्रभावित होतील.
आज भाग्य तुमच्यासोबत 92 टक्के असेल. मारुतीला शेंदूर अर्पण करा.
