Recruitment of Forest Guard Posts : प्रधान मुख्य वनरक्षक (Principal Chief Conservator of Forests) महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ‘वनरक्षक गट-क’ (Forest Guard Group-C’) च्या 2138 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. बारावी विज्ञान शाखा किंवा भूगोल, अर्थशास्त्र किंवा गणित असा विषय घेऊन उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील. एवढ्या मोठ्या पदांच्या जाहिरातीमुळे अनेकांना संधी मिळेल. या पदभरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 10 जूनपासून सुरू होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून आहे. (Recruitment for 2138 Posts of Forest Guard, Salary 69100)
वनविभागातील वनरक्षक (गट क) ही पदे सरळसेवेने भरायची आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून http://www.mahaforest.gov.in या वेबसाइटवरील भरती टॅबमध्ये उपलब्ध असलेल्या लिंकद्वारे विहित नमुन्यात अर्ज मागवले आहेत. अर्ज आणि परीक्षा शुल्क केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाईल. इतर कोणत्याही प्रकारातील अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. या भरतीचे तपशीलवार नोटिफिकेशन वेबसाइटवर उपलब्ध आहे.
एकूण पदे – 2138
पदाचे नाव – वनरक्षक (गट क)
शैक्षणिक पात्रता –
1. उमेदवाराचे उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (12 वी) ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
2. एसटी प्रवर्गातील उमेदवार 10वी उत्तीर्ण असल्यास अर्ज करण्यास पात्र असतील.
3. माजी सैनिक उमेदवार 10वी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असल्यास अर्ज करण्यास पात्र असतील.
4. याशिवाय, मराठी भाषेचे ज्ञान (लिहिणे, वाचणे, बोलणे) आवश्यक आहेत.
वयोमर्यादा –
किमान वय 18 वर्ष पूर्ण असावे. मागास प्रवर्गासाठी वयात सवलत दिली आहे.
अमागास प्रवर्गासाठी कमाल वयाची मर्यादा 27 वर्षे, मागास प्रवर्गासाठी 32 वर्षे, भूकंपग्रस्त/प्रकल्पग्रस्त/पदवीधर अंशकालीन कर्मचारी, रोजंदारी कामगार यासाठी अनुक्रमे 45 आणि 55 अशी वयोमर्यादा आहे.
शारीरिक पात्रता –
शारीरिक पात्रतेमध्ये पुरुषांची उंची किमान 163 सेंमी आणि महिलांची उंची 150 सेमी असणं आवश्यक आहे. तर पुरूषांची छाती न फुगवता 79 सेंमी आणि फुगवून 84 सेमी असावी.
पगार-
वनरक्षक संवर्गातील पदांसाठी 21700-69100 अधिक महागाई भत्ता आणि इतर नियमानुसार देय भत्ते लागू असणार आहेत.
अनुसूचित जमातीमधील उमेदवारांनी शारीरिक पात्रता शिथिल केलेली आहे. त्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
अर्जाची फी –
SC/ST उमेदवारांसाठी 1000 रुपये परिक्षा शुल्क आहे. आणि SC/ST उमेदवारांसाठी रु.900 तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी रु.900 प्रक्रिया शुल्क आहे. माजी सैनिकांसाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही.
परीक्षा शुल्क ना-परतावा आहे.
जाहिरात पाहा –
https://drive.google.com/file/d/1CKZpWrvTFiGo4h7ruRIAqSNjDJ4PACpH/view
ऑनलाईन परीक्षा –
ऑनलाईन अर्जातील माहितीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवाराचा, 120 गुणांचा (एकून 60 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण) स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा टी.सी.ए. आयओएन यांचे मार्फत घेण्यात येईल.
ऑनलाईन परिक्षेमध्ये चार विषय असणार आहेत.
मराठी – 30 गुण
इंग्रजी – 30 गुण
सामान्य ज्ञान – 30 गुण
बौध्दीक चाचणी- 30 गुण
– ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हबा 10 वी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहिल. परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने स्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल. ही परीक्षा दोन तासांची असेल आणि उमेदवारांना या परीक्षेत किमान 45% गुण मिळणे बंधनकारक आहे. तरच उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पुढील पात्र ठरतील.