तुम्ही देखील देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची संधी शोधत असाल तर तुमच्याठी आता एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank Of India) अनेक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी बॅंकेच्या अधिकृत वेबसाइटवर भरती संदर्भातले नोटिफिकेशन प्रकाशिकत करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील दिला आहे. स्टेट बॅंकते होणारी ही भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे.
स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये 1000 हून अधिक रिक्त पदांसाठी भरती करण्यात येत आहे. बॅंकेने 1 एप्रिल रोजी जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, चॅनेल मनेरजर फॅसिलेटर, चॅनेल मॅनेजर सुपरवायझर आणि सपोर्ट ऑफिसरच्या एकून 1022 पदांची भरती करायची आहे. या रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्रता धारक उमेदवारांनी sbi.co.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. आणि नंतर करिअर विभागात जावे. त्यानंतर तिथे दिलेल्या लिंकवरून थेट भरती संदर्भातील नोटीफिकेशन डाऊनलोड करू शकता. आणि अर्ज ऑनलाईन पेजवर जाऊन अर्ज देखील करू शकता.
अर्जादरम्यान, उमेदवारांनी विहित शुल्क ऑनलाइन माध्यमातून भरावे लागेल. या अर्ज प्रक्रियेअंतर्गत, उमेदवारांनी प्रथम आपली नाव नोंदणी करणे आवश्यक आहे आणि त्यानंतर नोंदणी केलेल्या सगळ्या तपशीलांसह लॉग इन करून रिक्त पदांसाठी अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे.
या अर्ज प्रक्रियेत तरूण उमेदवार सहभागी होऊ शकत नाहीत. या रिक्त पदांसाठी फक्त SBI किंवा इतर अन्य कोणत्याही सरकारी बॅंकेतील सेवानिवृत्त कर्मचारीच अप्लाय करू शकतात.
‘घर बंदूक बिरयानी’ सिनेमा सुपरहिट होणार; निर्मात्यांनी सांगितले त्यामागील कारण
उमेदवारांची निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही इंटरव्हूवच्या आधारावर होणार आहे. यासाठी प्रथम प्राप्त झालेल्या अर्जांची तपासणी केली जाईल. त्यानंतर उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. ही मुलाखत 100 गुणांसाठी असेल. उमेवारांच्या याच मुलाखतीच्या आधारे त्यांची निवड यादी तयार केली जाईल. स्टेट बॅंकेने जारी केलेल्या अधिसुचनेनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना चॅनेल मॅनेजर फॅसिलेटर, चॅनेल मॅनेजर सुपरवाइझर आणि सपोर्ट ऑफीसर या पदांसाठी अर्ज करू शकतात. महत्वाची बाब अशी की, ही भरती SBI द्वारे ANYTIME चॅनेल अंतर्गत कंत्राटी पध्दतीने केली जात आहे.
पगार –
चॅनेल मॅनेजर फॅसिलेटर- 36000 रुपये
चॅनेल मॅनेजर सुपरवाइझर – 41000 रुपये
सपोर्ट ऑफीस- 41000 रुपये
जाहिरात –
https://sbi.co.in/documents/77530/25386736/310323-Advertisement+Anytime+Channel+01.04.2023.pdf/0c34b846-b3c4-9fd5-b3e9-6a0a5d308a88?t=1680266348551
● अर्ज करण्याची अंतिम तारीख – 30 एप्रिल 2023
● अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या – sbi.co.in