Download App

वीज पारेषण विभागात तीन हजार पदांची मेगा भरती, 19 जुलैपर्यंत करू शकता अर्ज

  • Written By: Last Updated:

Maharashtra State Electricity Transmission Company Job : महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीत (Maharashtra State Electricity Transmission Company) लवकरच विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमदेवारांना चांगल्या पदाच्या नोकरीसोबत दमदार पगारही दिला जातो. (Recruitment of more than three thousand vacancies in Maharashtra Power Transmission Department, July 19 is the last date for application)

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी येथे कार्यकारी संचालक (प्रकल्प), मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण), महाव्यवस्थापक (वित्त व लेखा), कार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), उपकार्यकारी अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (पारेषण) , सहायक अभियंता (टेलिकॉम), वरिष्ठ तंत्रज्ञ (ट्रान्स सिस्टम), तंत्रज्ञ-I (ट्रान्स सिस्टम), तंत्रज्ञ-II (ट्रान्स सिस्टम), सहाय्यक तंत्रज्ञ (जनरल), सहाय्यक तंत्रज्ञ (जनरल), टायपिस्ट (मराठी) या पदांसाठी ही भरती आहे.

इच्छुक पात्र उमेदावारांना या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 जुलै 2023 आहे

एकूण जागा – 3129

पुणे पुन्हा हादरलं! प्रियकराचं सुपारी देत अपहरण; विवाहित प्रेयसीने प्रेमाला घेऊन गाठलं गुजरात 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे संबंधित पदांनुसार डिप्लोमा, १२ वी किंवा पदवीपर्यंतचे शिक्षण असणे आवश्यक आहे .

तसेच, उमेदवारांनी त्यांचे शिक्षण मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठातून पूर्ण केलेले असावे.

तसेच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असावा.

उमेदवारांनी पदाच्या सर्व अटी व शर्ती पूर्ण केल्या पाहिजेत.

आवश्यक कागदपत्रे
या पदभरतीसाठी अर्ज करतांना बायोडेटा, 10वी, 12वी आणि पदवी प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला , जातीचे प्रमाणपत्र (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधार कार्ड, परवाना), पासपोर्ट आकाराचे छायाचित्र हे कागदपत्रे आवश्यक आहेत.
या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदावारांना पदभरती आणि वयोमर्यादामध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता-
शासकीय मुख्य महाव्यवस्थापक (HR), महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड, प्रकाशगंगा, ई-ब्लॉक, भूखंड क्रमांक C-19, 7 वा मजला, HR विभाग, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (E), मुंबई-400051.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्जात काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर अर्ज प्राप्त झाल्यास अर्ज फेटाळण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 19 जुलै 2023

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

जाहिरात : https://www.mahatransco.in/news/active

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या : https://www.mahatransco.in/

Tags

follow us

वेब स्टोरीज