7000mAh बॅटरी अन् दमदार फीचर्ससह खरेदी करा ‘हा’ भन्नाट फोन; खर्च होणार फक्त 679

Redmi 15 5G Diwali Offers : सध्या दिवाळी खरेदीसाठी भारतीय बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित

Redmi 15 5G Diwali Offers

Redmi 15 5G Diwali Offers

Redmi 15 5G Diwali Offers : सध्या दिवाळी खरेदीसाठी भारतीय बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाजारात उत्तम ऑफर देखील देण्यात येत आहे. यातच या ऑफरचा फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत तुमच्यासाठी सध्या सर्वात भारी संधी उपलब्ध झाली आहे.

या ऑफरचा फायदा घेत तुम्ही Redmi चा नवीन 5G स्मार्टफोन फक्त 679 च्या मासिक EMI घरी आणू शकतात. या फोनमध्ये तुम्हा दमदार फीचर्ससह 7000mAh बॅटरी, 50MP प्रायमरी कॅमेरा आणि एक शक्तिशाली प्रोसेसर देखील मिळणार आहे. सध्या या फोनवर 3,000 पर्यंत थेट सूट मिळत आहे.

EMI आणि दिवाळी सेल डिस्काउंट ऑफर

Redmi 15 5G तीन स्टोरेज व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Amazon च्या दिवाळी धमाका सेल दरम्यान या फोनवर 3,000 पर्यंत मोठी सूट मिळत आहे. तर 679 चा नो-कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफरसारखे पर्याय देखील उपलब्ध आहेत. हा फोन Amazon आणि Redmi च्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करता येईल. रंग पर्यायांमध्ये सँडी पर्पल, फ्रॉस्ट व्हाइट आणि मिडनाईट ब्लॅक यांचा समावेश आहे.

Redmi 15 5G फीचर्स

Redmi 15 5G त्याच्या शक्तिशाली 7000mAh EV-ग्रेड सिलिकॉन-कार्बन बॅटरीसाठी ओळखला जातो, जो फोनला स्लिम देखील ठेवतो. ही बॅटरी 33W टाइप-सी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात 6.9-इंच FHD+ 144Hz डिस्प्ले आणि डॉल्बी व्हिजन सपोर्ट देखील आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6s Gen 3 5G प्रोसेसरने सुसज्ज आहे, जो HyperOS (Android 15) वर चालतो. तो 8GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेजला सपोर्ट करतो.

Redmi 15 5G कॅमेरा

Redmi 15 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP चा मेन कॅमेरा आहे. 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, जो सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी बेस्ट आहे.फोनमध्ये अनेक AI फीचर्स आहेत जी फोटोग्राफी आणि इतर कामासाठी वापरता येते.

 लाँच व्हेरिएंट  लाँच किंमत    दिवाळी ऑफर किंमत
 6GB + 128GB  16,999   13,999
8GB + 128GB  17,999   14,999
8GB + 256GB  19,999    15,999

India vs Australia : पर्थमध्ये मुसळधार पाऊस, सामना थांबला, विराट – रोहित फेल 

Exit mobile version