Download App

दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजना

LetsUpp | Govt.Schemes

महाराष्ट्रातील (Maharashtra)दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस (Quality Marathi film production)प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन विकास व सांस्कृतिक विकास विभागाकडून (Department of Tourism Development and Cultural Development)अर्थसहाय्य योजना (Financial assistance scheme)सुरु करण्यात आली.

योजनेच्या लाभासाठी प्रमुख अटी :
▪ लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
▪चित्रपट परिक्षण समितीने परिक्षणानंतर निश्चित केलेला दर्जा अंतिम असेल.
▪कोणत्याही चित्रपटाचे पुन:परिक्षण केले जात नाही.
▪अर्थसहाय्यासाठी सादर झालेल्या प्रत्येक चित्रपटाचे किमान 1 लाख रुपये भाडे शुल्काएवढे चित्रीकरण गोरेगांव चित्रनगरी किंवा कोल्हापूर चित्रनगरी येथे करणे अनिवार्य आहे. अन्यथा अर्थसहाय्यातून 1 लाख रुपये कपात केली जाईल.
▪ योजनेतील नियमात बदल करणे, सुधारणा करणे किंवा अर्थ लावणे याबाबतचे पूर्ण अधिकार शासनास असतील.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
✔ महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या नमून्यातील अर्ज.
✔ चित्रपट कथा, पटकथा, संवादाची प्रत आणि रिळे डिव्हीडीज / डिसीपी (डिजीटल सिनेमा पॅकेज) व सनदी लेखापालाने प्रमाणित केलेले नफा / तोटा व ताळेबंद व इतर संबंधित कागदपत्रे.

असे असेल योजनेच्या लाभाचे स्वरूप :
अ) ‘अ’ दर्जा प्राप्त चित्रपटास 40 लाख किंवा चित्रपट निर्मितीचा प्रत्यक्ष खर्च त्यापैकी जी रक्कम कमी असेल, ती रक्कम.
ब) ‘ब’ दर्जा प्राप्त चित्रपटास 30 लाख किंवा चित्रपट निर्मितीचा खर्च यापैकी जी रक्कम कमी असेल, ती रक्कम.

संपर्क कुठे करावा? : महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ, दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगांव (पश्चिम), मुंबई – 65.

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

Tags

follow us