iPhone मध्ये शूट केली शॉर्ट फिल्म, अ‍ॅपलच्या सीईओनी केलं कौतुक; म्हणाले…

Apple चे आयफोन हे तुम्हा-आम्हासाठी नवीन नाहीत. अ‍ॅपलच्या सर्वच उत्पादनाची जगभर चर्चा होत असते. अशीच एक चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. अ‍ॅपलने काही महिन्यापूर्वी बाजरात आणलेल्या iPhone 14 Pro मध्ये शूट केलेल्या एक शॉर्टफिल्मचा सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. या शॉर्टफिल्मचे नाव आहे फुरसत. हि शॉर्ट फिल्म अँपलच्या iPhone 14 Pro वर शूट […]

Screenshot 2023 02 06 At 11.39.41 AM

Screenshot 2023 02 06 At 11.39.41 AM

Apple चे आयफोन हे तुम्हा-आम्हासाठी नवीन नाहीत. अ‍ॅपलच्या सर्वच उत्पादनाची जगभर चर्चा होत असते. अशीच एक चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. अ‍ॅपलने काही महिन्यापूर्वी बाजरात आणलेल्या iPhone 14 Pro मध्ये शूट केलेल्या एक शॉर्टफिल्मचा सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

या शॉर्टफिल्मचे नाव आहे फुरसत. हि शॉर्ट फिल्म अँपलच्या iPhone 14 Pro वर शूट केली आहे. ३० मिनिटाच्या या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन विशाल भारद्वाज यांनी केले आहे. सोशल मीडियावर या फिल्मबद्दल अनेक लोक आपल्या प्रतिक्रया देत आहेत. कौतुक करत आहेत.

कौतुक करणाऱ्यांमध्ये अ‍ॅपलच्या सीईओचाही समावेश आहे. नुकतंच अ‍ॅपलचे सीईओ टीम कुक यांनी एक ट्विट करून या फिल्मचं कौतुक केलं आहे. या शॉर्ट फिल्मबद्दल टीम कुक यांनी लिहलं आहे की, दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांची ही सुंदर अशी शॉर्ट फिल्म पहा, जी भविष्यात काय घडू शकते याचा शोध घेते. यामध्ये अप्रतिम सिनेमॅटोग्राफी आणि कोरिओग्राफी करण्यात आली आहे.

विशाल भारद्वाज यांनी नुकतेच आयफोन १४ प्रो मधून या शॉर्टफिल्मचे शुटिंग केले आहे. यामध्ये ईशान खट्टर आणि वामिका गब्बी यांनी काम केले असून त्यांनी निशांत नावाच्या माणसाची कथा यामध्ये मंडळी आहे. जो एका प्राचीन अवशेषाच्या मदतीने भविष्य पाहण्याची शक्ती प्राप्त करतो. ही शॉर्ट फिल्म नुकतीच युट्युबवर प्रदर्शित झाली आहे.

Exit mobile version