Download App

Thandai : स्पेशल थंडाई रेसिपी

साहित्य
1 चमचे बडीशेपची बी
5/6 pieces बदाम
3/4 piece हिरवी वेलची
1 चमचे खसखस
2/3 चमचे सुकवलेल्या गुलाबाच्या पाकळ्या
1 कप साखर
8 – ब्लॅक पेपर
5/6 piece पिस्ता
5/6 piece काजू
2 कप थंड दूध
1 कप पाणी
आवश्यकतेनुसार केशर

Step 1: सामग्री
एक चमचा बडिशेप, पाच ते सहा बदाम, एक चमचा खरबुजाच्या बिया, तीन ते चार हिरव्या वेलच्या, एक चमचा खसखस, एक चमचा सुकवलेल्या गुलाबाच्या पाकळ्या, एक कप साखर, काळी मिरी – आठ , पाच ते सहा पिस्ता, काजू, थंड दूध, केशर, एक ग्लास पाणी

Step 2: सर्व सामग्री पाण्यात भिजत ठेवा
एका बाउलमध्ये बदाम, काजू, पिस्ता, बडिशेप, गुलाबाच्या पाकळ्या, खरबुजाच्या बिया, काळी मिरी, हिरवी वेलची, खसखस एकत्रित घ्या आणि एक ग्लास पाण्यामध्ये सर्व सामग्री भिजत ठेवा. हवे असल्यास आपण यामध्ये केशर देखील मिक्स करू शकता. तीन ते चार तास सर्व सामग्री भिजत ठेवा.

Step 3: पातळ पेस्ट तयार करून घ्या
सर्व सामग्री व्यवस्थित भिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटा आणि पातळ पेस्ट तयार करा.

Step 4: कापडाच्या मदतीने पेस्ट गाळा
एका स्वच्छ व पातळ कापडाच्या मदतीने हे मिश्रण गाळून घ्यावे.

Step 5: साखर आणि दूध एकत्रित घ्यावे
आता दुसऱ्या भांड्यामध्ये साखर घ्या आणि त्यामध्ये दोन ग्लास थंड दूध ओतावे. यानंतर थंडाईचे मिश्रणही दुधामध्ये मिक्स करा.

Step 6: तयार आहे स्पेशल थंडाई
साखर पूर्णपणे विरघळली जाईल, याची काळजी घ्यावी. तयार आहे टेस्टी आणि हेल्दी होममेड

Tags

follow us