स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये 271 रिक्त जागांसाठी बंपर भरती, अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

State Bank Of India recruitment 2023 : अनेकजण सरकारी नोकरी किंवा बॅंकेत जॉब मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, आज या प्रचंड स्पर्धच्या युगात नोकरी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तुम्ही देखील सरकारी जॉब किंवा बॅंक जॉबच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आता गुड न्यूज आहे. कारण, देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (State […]

Untitled Design   2023 04 30T154038.873

Untitled Design 2023 04 30T154038.873

State Bank Of India recruitment 2023 : अनेकजण सरकारी नोकरी किंवा बॅंकेत जॉब मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, आज या प्रचंड स्पर्धच्या युगात नोकरी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तुम्ही देखील सरकारी जॉब किंवा बॅंक जॉबच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आता गुड न्यूज आहे. कारण, देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (State Bank Of India) नोकरी करण्याची संधी आता चालून आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अनेक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) भरती 2023 ची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. बँक जॉबसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज करण्याची ही चांगली संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार आहे.

SBI SCO भर्ती 2023 मोहिमेद्वारे 200 हून अधिक रिक्त पदे भरली जातील. 29 एप्रिलपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज प्रक्रियेची अंतिम तारीख 19 मे 2023 आहे. पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर महत्त्वाची माहिती खाली पाहता येईल. स्पेशलिस्ट ऑफिसर्स पदाच्या भरतीसंबंधित सविस्तर माहिती स्टेट बॅंकेच्यचा sbi.co.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

नियमित पदे: १८२ पदे
कंत्राटी पदे: 35 पदे
एकूण रिक्त पदांची संख्या – 217 पदे

कोण अर्ज करू शकतो?
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संगणक विज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञान / सॉफ्टवेअर अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स आणि अभियांत्रिकी
कम्युनिकेशन इंजिनीअरिंग किंवा समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे.
किंवा MCA किंवा M.Tech किंवा Sc देखील अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव आणि वयोमर्यादा याबद्दल अधिक माहिती अधिसूचनेत पाहता येईल.

Fakhar Zaman Record: बाबर आझम व विव्ह रिचर्ड्सला मागे टाकत फखर जमानने केला हा मोठा विक्रम

निवड प्रक्रिया
स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरपदांसाठी निवड प्रक्रिया ही शॉर्टलिस्ट आणि मुलाखत फेरीच्या माध्यमातून होणार आहे. बँकेने स्थापन केलेली शॉर्टलिस्टिंग समिती शॉर्टलिस्टिंग पॅरामीटर्स ठरवेल आणि त्यानंतर बँकेच्या मापदंडात बसणारे उमेदवार पहिल्या टप्यात निवडली जातील. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. 100 गुणांसाठी मुलाखत घेतली जाईल. त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

अर्ज फी
या पदभरतीसाठी ओपन/ OBC/ EWS उमेदवारांना 750 रुपये अर्ज शुल्क आहे. तर SC/ST/PWD उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे. डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंग च्या माध्यमातून पेमेंट केले जाऊ शकते.

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 19 मे 2023
अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या – sbi.co.in

Exit mobile version