Download App

Surya Grahan 2025 : वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आज, भारतात दिसणार का? जाणून घ्या सर्वकाही

Surya Grahan 2025 : वर्ष 2025 चा आज शेवटचा सूर्यग्रहण दिसणार आहे. 21 सप्टेंबर रविवार रोजी जगातील काही देशांमध्ये आंशिक सूर्यग्रहण दिसणार आहे.

  • Written By: Last Updated:

Surya Grahan 2025 : वर्ष 2025 चा आज शेवटचा सूर्यग्रहण दिसणार आहे. 21 सप्टेंबर रविवार रोजी जगातील काही देशांमध्ये आंशिक सूर्यग्रहण दिसणार आहे. ज्या देशांमध्ये सूर्यग्रहण दिसेल त्या देशांमध्ये सुर्यग्रहणाच्या 12 तास आधी सुतक लागू होतो. मुले, वृद्ध आणि आजारी वगळता सर्वांसाठी सुतक काळात खाणे-पिणे प्रतिबंधित आहे.

वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण किती वाजता सुरू होईल?

वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण (Solar Eclipse) रात्री 11 वाजता सुरु होणार असून 22 सप्टेंबर पहाटे 3:24 वाजता संपणार आहे. मात्र वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. भारतात आज सूर्यग्रहण दिसणार नसल्याने भारतात सुतक काळ नसणार आहे.

या देशांमध्ये दिसणार वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण

वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरु होणार असून न्यूझीलंड, अंटार्क्टिका आणि आसपासच्या दक्षिण पॅसिफिक प्रदेशांमधून दिसणार आहे. सूर्याचा अंदाजे 85% भाग व्यापणारे जास्तीत जास्त ग्रहण न्यूझीलंडच्या दक्षिण महासागर प्रदेशांमधून दिसेल.

ऑस्ट्रेलियातील क्राइस्टचर्च, सिडनी आणि होबार्ट, न्यूझीलंडमधील ऑकलंड, वेलिंग्टन आणि नॉरफोक बेटावरील किंग्स्टन या काही लोकप्रिय शहरात देखील सुर्यग्रहण दिसणार आहे.

पावसाचा कहर! शिरापूर पुलावर तरुण वाहून गेला, मढीत दोन जणांना नागरिकांनी वाचवलं

या देशांमध्ये सूर्यग्रहण दिसणार नाही

भारतासह (India) श्रीलंका, नेपाळ, युएई, अफगाणिस्तान आणि इतर आशियाई देशांमध्ये हे ग्रहण दिसणार नाही. तसेच आफ्रिका, युरोप, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या बहुतेक भागांमधून हे ग्रहण दिसणार नाही.

follow us