Download App

तांदूळ पापड राइस रेसिपी

साहित्य :

1 कप तांदूळ
2 चमचे तूप
1.2 चमचे मोहरीच्या बिया
1.2 चमचे उडदाची डाळ
1.2 चमचे चणा डाळ
2/3 – बेडगी मिरची
10 – कढीपत्ता
1.2 कप किसलेले नारळ
6/8 – काजू
आवश्यकतेनुसार मीठ
आवश्यकतेनुसार हिंग
आवश्यकतेनुसार पापड

कृती :

Step 1: तुपामध्ये डाळी फ्राय करून घ्या
एका पॅनमध्ये तूप गरम करत ठेवा. तुपामध्ये अर्धा चमचा मोहरी, उडदाची डाळ, चणा डाळ आणि काजू परतून घ्या. दोन मिनिटांसाठी सर्व सामग्री फ्राय करा आणि एका बाजूला ठेवून द्या.

Step 2: मिक्सरमध्ये सामग्री वाटून पेस्ट तयार करा
आता दुसऱ्या पॅनमध्ये कढीपत्ता, बेडगी मिरच्या, मीठ आणि चिमूटभर हिंग मिक्स करा. यानंतर मिक्सरच्या भांड्यात १/२ कप किसलेले ओले खोबरे आणि १/२ कप बारीक किसलेले सुके खोबरे घ्या. दोन्ही सामग्री वाटून त्याची पावडर तयार करा.

Step 3: बाउलमध्ये शिजवलेला भात घ्या
आता एका वेगळ्या बाउलमध्ये शिजवलेला भात घ्या. त्यात फ्राय केलेली सर्व सामग्री आणि मिक्सरमध्ये वाटलेले मिश्रण देखील मिक्स करा.

Step 4: मिक्सरमधील पेस्ट आणि पापड मिक्स करा
सर्वात शेवटी भातामध्ये दोन ते तीन तांदळाचे पापड कुस्करून मिक्स करा. सर्व सामग्री एकजीव करा. तयार आहे पापड भाताची खमंग डिश !

Tags

follow us