Download App

Tata Curvv EV ने बाजारात घेतली कडक एन्ट्री, देणार 585Km रेंज, किंमत आहे फक्त …

Tata Curvv EV : गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय ऑटो बाजारात चर्चेचा विषय ठरलेली टाटाची इलेक्ट्रिक कार Tata Curvv EV आज  बाजारात लाँच झाली आहे.

  • Written By: Last Updated:

Tata Curvv EV : गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय ऑटो बाजारात चर्चेचा विषय ठरलेली टाटाची इलेक्ट्रिक कार Tata Curvv EV आज  बाजारात लाँच झाली आहे. या कारमध्ये कंपनीकडून दमदार फीचर्स आणि पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे.

कंपनीनुसार Tata Curvv EV एका चार्जमध्ये तब्बल 585Km रेंज देणार. भारतीय बाजारात ही पहिली इलेक्ट्रिक कूप एसयूव्ही आहे. चला मग जाणून घेऊया कंपनीकडून या दमदार कारमध्ये कोणत्या कोणत्या फीचर्स देण्यात येणार आहे.

Tata Curvv EV रेंज

भारतीय बाजारात Tata Curvv EV दोन बॅटरी पर्यायसह लाँच करण्यात आली आहे. या कारमध्ये कंपनीकडून 45 kWh आणि 55kWh क्षमतेचे बॅटरी देण्यात आली आहे. ज्यामध्ये लाँग रेंज व्हेरियंटला फुल चार्जमध्ये 585 किलोमीटर एआरएआय रेंज मिळणार आहे. तर 45 kWh बॅटरीसह ती 502 किमी एआरएआय रेंज मिळते. तर कार चार्जसाठी कंपनीने 70kW क्षमते चार्जर दिले आहे. या चार्जरच्या मदतीने 10 ते 80 टक्के चार्ज फक्त 40 मिनिटांत होऊ शकतो. तर 150 किलोमीटरपर्यंतची रेंज अवघ्या 15 मिनिटांच्या चार्जमध्ये मिळू शकते.

Tata Curvv EV फीचर्स

तसेच या कारमध्ये 18 इंच व्हील्ससह 190 मिमी ग्राउंड क्लीयरन्स, 450 मिमी वॉटर वेडिंग कॅपेसिटी फ्लश डोअर हँडल, 500 लिटर बूट स्पेस, कनेक्ट केलेले ॲप्स, एलईडी लाइट्स, व्हेंटिलेटेड सीट्स, मल्टी ड्राईव्ह मोड्स, ॲम्बियंट लाइट, पॅनोरॅमिक सनरूफ, पॉवर टेलगेट सारखे फीचर्स देण्यात आले आहे. या व्यक्तरिक्त स्टार्टर ॲक्टिव्हेशन, क्रूझ कंट्रोल, एअर प्युरिफायर, रेन सेन्सिंग वायपर्स, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.

Tata Curvv EV लेव्हल-2 ADAS

Tata Curve EV मध्ये कंपनीने अनेक सेफ्टी फीचर्स देखील दिले आहे. ज्यामुळे प्रवासादरम्यान प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यास मदत मिळणार आहे. सेफ्टी फीचर्समध्ये कंपनीने या कारमध्ये सहा एअरबॅग्ज देखील दिले आहे. याच  बरोबर या कारमध्ये  थ्री पॉइंट ईएलआर सीटबेल्ट, सीटबेल्ट अँकर प्री-टेन्शनर, फोर्टिफाइड बॉडी स्ट्रक्चर, आयसोफिक्स, लेव्हल-2 एडीएएस 20 सेफ्टी फीचर्स, ईएसपी, ईपीबी, 360 सराउंड व्ह्यू, फ्रंट पार्किंग सेन्सर यांसारखी फीचर्स देखील कंपनीकडून देण्यात आली आहेत.

Tata Curvv EV  किंमत 

भारतीय बाजारात या दमदार कारची एक्स-शोरूम किंमत 17.49 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र ही किंमत बदलली देखील जाऊ शकते. या कारच्या टॉप व्हेरियंटची किंमत 21.99 लाख  आहे. जर तुम्ही ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 12 ऑगस्टपासून या कारची बुकिंग सुरु होणार आहे.

“पर्यायांचा विचार करा, तीव्र विरोध करा”; PM मोदींनी थेट पॅरिसमध्ये फिरवला फोन

तर Tata Curvv पेट्रोल आणि  डिझेल व्हेरिएंट 2 सप्टेंबर रोजी लाँच होणार आहे. भारतीय बाजारात ही कार Mahindra XUV 400, MG ZS EV सारख्या SUV ला टक्कर देणार आहे.

follow us