Tata Technologies IPO : टाटा ग्रुपचा बहुप्रतिक्षित टाटा टोक्नॉलॉजीजचा आयपीओ ( Tata Technologies IPO) आज गुरूवारी 30 नोव्हेंबरला बीएसई आणि एनएसईवर लिस्ट झाला आहे. या आयपीओची ही एन्ट्री धमाकेदार झाली आहे. कारण लिस्टिंगच्या दिवशीच या आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणुकदारांचे पैसे डबल झाले आहेत.
लिस्टिंग होताच गुंतवणुकदारांचे पैसे झाले डबल
टाटा टोक्नॉलॉजीजचा हा आयपीओ 140 टक्के प्रीमियमसह 1199.95 रूपायांना लिस्टच झाला आहे. तर एनएसईवर कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग 140 टक्के प्रीमियमसह 1,200 रूपांयावर झाली. तर लिस्टिंगच्या काही वेळानंतरच हा शेअर त्याच्या किंमतीच्या जवळपास 180 टक्क्यांनी वाढून 1398 रूपायांवर पोहचला. तर टाटा टोक्नॉलॉजीजच्या या आयपीओची किंमत 475 ते 500 रूपये निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी गुंतवणुकदारांना मोठा फायदा झाला आहे.
टाटा ग्रुपच्या शेअरबद्दल सांगायचं झालं तर तब्बल 15 वर्षांनी टाटा ग्रुपच्या एखाद्या शेअरचं शेअर बाजारात लिस्टिंग झालं आहे. या अगोदर 2004 ला टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) च्या शेअर्सची लिस्टिंग झाली होती. त्यामुळे टाटा टोक्नॉलॉजीजच्या या आयपीओची गुंतवणुकदार आतुरतेने वाट पाहत होते. तर 18 वर्षांनंतर आलेल्या टाटा ग्रुपच्या या शेअरने गुंतवणुकदारांना मालामाल केलं आहे.
Sangli News : वंचित आघाडीच्या सभेत टिपू सुलतानचा फोटो; आंबेडकरांचं पोलिसांना थेट आव्हान
गुंतवणुकदारांनी टाटा ग्रुपच्या या टाटा टोक्नॉलॉजीज या आयपीओला भरभरून प्रतिसाद दिला होता. आयपीओच्या तिसऱ्याच दिवशी 69.4 पटींनी सब्सस्क्राईब केला गेला होता. त्याला रेकॉर्डब्रेक 73.6 लाख अर्ज आले होते. 22 नोव्हेंबरला हा आयपीओ आला होता. तर 24 नोव्हेंबरला तो बंद झाला होता. कंपनीने 3042 कोटी जमवण्यासाठी हा आयपीओ आणला होता.
15th International Kudo Tournament: खिलाडी अक्षय कुमारसह आंतरराष्ट्रीय कुडो स्पर्धत दिसली दिशा पटानी
टाटा ग्रुपचा टाटा टोक्नॉलॉजीज हा आयपीओ पूर्णपणे प्रमोटर आणि गुंतवणुकदारांकडून 6.09 कोटी इक्विटी शेअर्सची विक्रिची ऑफर आहे. ओएफएसमध्ये 60,850,278 शेअर्सचा समावेश आहे. त्यामध्ये टाटा मोटर्स लिमिटेड द्वारे 46,275,000 शेअर्सची विक्री तर अल्फा टीसी होल्डिंग्स द्वारे 9,716,853 शेअर्स आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड द्वारे 4,858,425 इक्विटी शेअर्सची विक्रीचा समावेश आहे.