Download App

खुशखबर ! 10 वी उत्तीर्ण उमेवारांसाठी ठाणे महानगरपालिकेत भरती जाहिर, महिन्यला 20 हजार रुपये पगार

  • Written By: Last Updated:

Thane Municipal Corporation Recruitment 2023 : आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे. या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळवणं हे फारच अवघड काम झालं आहे. कारण दिवसेदिवस देशात बेरोजगारांची संख्या प्रचंड वाढ आहे. अनेक युवक हे नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, मनासाराखी नोकरी मिळण्याासठी चांगलीच कसरत करावी लागते. तुम्ही देखील बेरोजगार असाल आणि नोकरी मिळण्याच्या प्रयत्नात असाल तर आता तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ठाणे महानगरपालिकेतर्फे (Thane Municipal Corporation) 10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. उपलब्ध रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज http://www.thanecity.gov.in या संकेतथळावर डाऊनलोड करून ऑफलाईन सबमिट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या भरतीचे नोटीफिकेशन प्रकाशित करण्यात आले असून एकून 24 रिक्त पदांसाठी या भरतीची ठाणे महानगरपालिकेने घोषणा केली आहे. 12 एप्रिल 2023 रोजी बायोडेटा आणि सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांसह खालील पत्यावर मुलाखत पार पडणार आहे.

या भरती अंतर्गत भरण्यात येणारी पदे ही सहा महिन्याच्या कालावधीसाठी भरण्यात येत आहेत.

पदाचे नाव – परिचर (अटेंडंट)

रिक्त पदे – 24
अनुसूचित जाती – 2
अनुसूचित जमादी – 2
भटक्या जमाती (ड) – 1
विशेष मागास प्रवर्ग – 1
इतर मागास वर्ग – 6
आदुघ – 2
खुला -10

शैक्षणिक पात्रता
1. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण अर्थात 10 वी पास (SSC)
2. शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था डिसेक्शन हॉलमध्ये/पोस्टमार्टम संबंधी कामाचा 3 वर्षाचा अनुभव
3. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MSCIT किंवा, DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परिक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
4. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

राष्ट्रीय दर्जा रद्द झाल्यानंतर सुनिल तटकरे म्हणाले, आम्ही आमचं म्हणणं… 

वयाची अट
SC/ST – 5 वर्ष सुट
OBC – 3 वर्ष सुट
जनरल – 38 वर्ष

नोकरी ठिकाण – ठाणे

फी – नाही

पगार
20000 रुपये दरमहा

अर्जाची प्रक्रिया – ऑफलाईन

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारिख
12 एप्रिल 2023 (सकाळी 11 वाजता मुखालतीस सुरूवात होणार आहे)

मुलाखतीचा पत्ता
कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह,
स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला,
प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरूण कुमार वैद्य मार्ग,
चंदनवाडी पाचपाखडी, ठाणे

जाहिरात-
https://drive.google.com/file/d/1t8-iggn2BJcj1EgtclUfmcHCDPBAHjkl/view

● अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या – https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html

Tags

follow us