शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता होईल दूर, हे आरोग्यदायी ज्यूस नक्की घ्या

मुंबई : निरोगी शरीरासाठी हिमोग्लोबिनची पातळी व्यवस्थित राहणे आवश्यक असते. तसेच जर शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर तुम्हाला अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागेल. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे एखाद्याला अॅनिमिया सारख्या गंभीर आजार होऊ शकतो. म्हणूनच रक्तातील हिमोग्लोबिन कमी असल्यास त्याच्यात सुधारणा करणे गरजेचे असते. यासाठी आज आम्ही तुम्हाला काही हेल्दी ज्यूसबाबत सांगणार आहोत. या ज्यूसच्या साहाय्याने […]

Untitled Design   2023 03 23T174205.475

Untitled Design 2023 03 23T174205.475

मुंबई : निरोगी शरीरासाठी हिमोग्लोबिनची पातळी व्यवस्थित राहणे आवश्यक असते. तसेच जर शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर तुम्हाला अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागेल. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे एखाद्याला अॅनिमिया सारख्या गंभीर आजार होऊ शकतो. म्हणूनच रक्तातील हिमोग्लोबिन कमी असल्यास त्याच्यात सुधारणा करणे गरजेचे असते. यासाठी आज आम्ही तुम्हाला काही हेल्दी ज्यूसबाबत सांगणार आहोत. या ज्यूसच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता सहजरित्या दूर करू शकतात.

बीट रस : शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी बीटरूटचे सेवन फायदेशीर ठरते. बीटरूट हा लोहाचा चांगला स्रोत मानला जात असून यामध्ये प्रामुख्याने पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि मॅंगनीज मोठ्या प्रमाणात आढळते. म्हणूनच तुम्हाला कधी हिमोग्लोबिनची कमतरता भासली तर बीटरूटचा रस अवश्य घ्यावा.

पालक : हिमोग्लोबिनच्या कमतरतेने त्रस्त असाल तर तुम्ही ही समस्यां दूर करण्यासाठी पालक स्मूदीचे सेवन करू शकता. पालकामध्ये अनेक पोषक घटक आढळतात. यामध्ये प्रामुख्याने आयर्न, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी यांसारखे पोषक तत्व आढळतात. याच्या सेवनाने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी मदत होते.

Nitesh Rane : राज ठाकरेंनी सांगितलेलं खरंय, जो माणूस वडिलांना धमकी…

डाळिंबाचा रस : शरीरातील हिमोग्लोबिनची मात्रा वाढवण्यासाठी डाळिंब हा देखील एक उत्तम पर्याय आहे. शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी तुम्ही डाळिंबाचा रस पिऊ शकता. डाळिंबात लोह आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक आढळून येतात. तुम्ही डाळिंबाचा रस प्याल तर तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता सहजरित्या दूर होते.

जनतेचे पैसे लूटून हे ‘मोदी’ देशाबाहेर पळून गेले…नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल

मनुका रस : ड्रायफ्रूट्स हे शरीराच्या वाढीसाठी महत्वाचे असते. यातच आपण यामध्ये मनुका नक्की खाल्ला असेल. हा मनुका शरीरातील रक्ताची पातळी व्यवस्थित करण्यासाठी फायदेशीर ठरतो. मनुका हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यासाठी देखील उपयुक्त ठरेल. ड्रायफ्रूट्स मध्ये समावेश असलेले मनुक्यात अनेक पोषक घटक आढळतात. यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे, लोह आणि पोटॅशियम देखील आढळते. अशा परिस्थितीत हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी तुम्ही मनुका ज्यूस पिऊ शकता.

Exit mobile version