लाखो रुग्णांसाठी धोक्याची घंटा? WHO च्या संस्थेने 3 औषधांबाबत दिला मोठा इशारा

विशेष म्हणजे, उच्च रक्तदाब, फंगल इन्फेक्शन आणि अवयव प्रत्यारोपण रिजेक्शन रोखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या औषधांचा जगात लाखो लोक वापर करतात.

Untitled Design (84)

Untitled Design (84)

The WHO has issued a major warning regarding three medicines : जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अंतर्गत येणाऱ्या एजन्सीने तीन अत्यंत सामान्य औषधांना मानवांसाठी ‘कर्करोगजनक ग्रुप-1’ श्रेणीमध्ये ठेवलंय. याचा थेट अर्थ असा की, या औषधांच्या नियमित वापरामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो. विशेष म्हणजे, उच्च रक्तदाब, फंगल इन्फेक्शन आणि अवयव प्रत्यारोपण रिजेक्शन रोखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या औषधांचा जगात लाखो लोक वापर करतात.

भारतात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या या 3 औषधांमुळे कर्करोगाचा धोका, WHO च्या एजन्सीचा मोठा इशारा
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अंतर्गत येणाऱ्या एजन्सीने तीन अत्यंत सामान्य औषधांना मानवांसाठी ‘कर्करोगजनक ग्रुप-1’ श्रेणीमध्ये ठेवलंय. याचा थेट अर्थ असा की, या औषधांच्या नियमित वापरामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो. विशेष म्हणजे, उच्च रक्तदाब, फंगल इन्फेक्शन आणि अवयव प्रत्यारोपण रिजेक्शन रोखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या औषधांचा जगात लाखो लोक वापर करतात. दरम्यान, तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय की हे वर्गीकरण केवळ धोक्याची पूर्वकल्पना देणारे असून, रुग्णांनी कोणत्याही परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय आपले उपचार अचानक बंद करू नयेत…

कर्करोगास कारणीभूत ठरणारी ही ‘3’ प्रमुख औषधे :
हायड्रोक्लोथियाझाइड (Hydrochlorothiazide) : उच्च रक्तदाबाच्या उपचारासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे औषध.
वोरिकोनाझोल (Voriconazole) : विविध प्रकारच्या फंगल इन्फेक्शनवर मात करण्यासाठी वापरले जाणारे औषध.
टॅक्रोलिमस (Tacrolimus) : अवयव प्रत्यारोपणानंतर शरीराने तो अवयव स्वीकारण्यास नकार दिल्यास, तो धोका रोखण्यासाठी दिले जाणारे प्रभावी औषध.

नितीन नबीन यांच्या नव्या टीमची घोषणा, भारती पवार, तावडे कुणा-कुणाला संधी

1. हायड्रोक्लोरोथियाझाइड (Hydrochlorothiazide) – जागतिक आरोग्य संघटनेची कर्करोग संशोधन संस्था असलेल्या ‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर’ (IARC) च्या ताज्या अभ्यासात या औषधामुळे उद्भवणाऱ्या धोक्याचा खुलासा झालाय. विशेष म्हणजे, या 22 सदस्यांच्या उच्चस्तरीय पॅनेलमध्ये भारतीय वैज्ञानिक जीबी जेना यांचाही समावेश होता. IARC च्या मते, हायड्रोक्लोरोथियाझाइडच्या सेवनामुळे ‘स्क्वॅमस सेल कार्सिनोमा’ (Squamous Cell Carcinoma) आणि ओठाचा कर्करोग होण्याची दाट शक्यता असल्याचे पुरेसे पुरावे हाती आले आहेत. हा स्क्वॅमस सेल कार्सिनोमा म्हणजे त्वचेच्या कर्करोगाचा दुसरा सर्वात सामान्य प्रकार आहे.

अमेरिका आणि डेन्मार्क येथे झालेल्या व्यापक संशोधनात असे समोर आले की, जे रुग्ण दीर्घकाळ हायड्रोक्लोरोथियाझाइडचे सेवन करतात, त्यांच्यामध्ये त्वचेच्या कर्करोगाचे प्रमाण लक्षणीयरीत्या जास्त असते. यामागचे मुख्य कारण ‘फोटो-टॉक्सिसिटी’ (Photo-toxicity) हे आहे. हे औषध अतिनील (UV) किरणांबद्दल त्वचेची संवेदनशीलता कमालीची वाढवते, ज्यामुळे कडक उन्हात जाताच त्वचेच्या DNA ला गंभीर नुकसान पोहोचण्याचा धोका कैक पटीने वाढतो.

2. वोरिकोनाझोल (Voriconazole) – प्रत्यारोपण (Transplant) केलेल्या आणि दीर्घकाळ उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये वोरिकोनाझोलचा वापर व्यापक प्रमाणात होतो. मात्र, या औषधाचा संबंधही थेट स्क्वॅमस सेल स्किन कॅन्सरशी जोडला गेला आहे. यामागेही ‘फोटो टॉक्सिक’ यंत्रणाच कारणीभूत असून, हे औषध त्वचेच्या विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाला थेट प्रोत्साहन देत असल्याचे अभ्यासात स्पष्ट झाले आहे.

समाज कल्याणच्या पैशांबाबत कायदा करा; लाडक्या बहिणीसाठी वळवल्याचा आरोप करत आठवलेंची मागणी

3. टॅक्रोलिमस (Tacrolimus) – टॅक्रोलिमसचा गंभीर संबंध ‘नॉन-हॉजकिन लिंफोमा’ आणि ‘पोस्ट-ट्रांसप्लांट लिम्फोप्रोलिरेटिव्ह डिसऑर्डर’ सारख्या आजारांशी जोडला गेलाय. जरी ल्यूकेमिया आणि स्किन कार्सिनोमाच्या बाबतीत पुरावे मर्यादित असले, तरी या औषधाचा मुख्य धोका मानवी इम्युन सिस्टीम (प्रतिकारशक्ती)शी जोडलेला आहे. यामुळे शरीराची असामान्य पेशींना नष्ट करण्याची नैसर्गिक क्षमता प्रचंड क्षीण होते.

भारतासाठी ही चिंताजनक घंटा का आहे? भारतात उच्च रक्तदाबाच्या रुग्णांवर उपचारासाठी ‘हायड्रोक्लोरोथियाझाइड’ हे अत्यंत लोकप्रिय आणि सर्रास वापरले जाणारे औषध आहे. ज्यांची इम्युन सिस्टीम आधीच अतिशय कमजोर आहे, अशा रुग्णांमध्ये ‘वोरिकोनाझोल’चा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. भारतात ऑर्गन ट्रान्सप्लांटनंतर दिली जाणारी काळजी आणि उपचारांमध्ये ‘टॅक्रोलिमस’ हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.

तज्ज्ञांच्या मते, भारतासारख्या देशात या चेतावणींकडे दुर्लक्ष करणे अत्यंत महागात पडू शकते. आपल्या देशात विनापरवाना किंवा विचार न करता औषधे लिहून देणे, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मेडिकलमधून सहज औषधे मिळणे आणि औषधोपचाराच्या अचूक नियमांचे पालन न करणे ही एक मोठी राष्ट्रीय आणि आरोग्यविषयक समस्या बनली आहे. त्यामुळे आता वैद्यकीय क्षेत्रात अधिक सतर्कता बाळगण्याची वेळ आलीय.

Exit mobile version