Download App

Milk Benefits: त्वचेला चमकदार बनवण्यापासून ते लठ्ठपणा टाळण्यासाठी दूध पिण्याचे अनेक फायदे

  • Written By: Last Updated:

मुंबई : दररोज दूध प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. “दूध प्या आणि निरोगी राहा” हे तुम्ही ऐकले असेल अर्थात हे खरे आहे की दुधाच्या सेवनाने तुमचे शरीर अनेक प्रकारे मजबूत होते. दूध हे कॅल्शियम आणि फॉस्फरसचा चांगला स्रोत आहे, जे निरोगी राहण्यासाठी खूप महत्वाचे आहे.

दररोज किमान एक ग्लास दूध पिणे चांगले मानले जाते. दूध प्यायल्याने हाडे आणि दातांची मजबुती सुधारते. प्रौढांनी दररोज तीन कप दूध प्यावे. दूध तुमच्या आरोग्याला अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते.

दूध पिण्याचे फायदे

चमकणारी त्वचा

कच्चे दूध तुमच्या त्वचेला उत्तम ग्लो देते. कच्च्या दुधात जीवनसत्त्वे B12, A, D, B6, बायोटिन, प्रोटीन, कॅल्शियम आणि इतर पोषक घटक असतात. ही पोषकतत्त्वे तुमच्या त्वचेचे पोषण करण्याचे काम करतात. तुम्ही कॉटनच्या मदतीने चेहऱ्यावर दूध लावू शकता. 15 मिनिटे ठेवल्यानंतर ते चांगले धुवा.

निरोगी दात

दूध प्यायल्याने दात मजबूत होण्यास मदत होते आणि दातांची इनॅमल सुरक्षित राहते. दुधाचे सेवन केल्याने दात मजबूत होतात आणि ते निरोगी राहतात. दुधाचे न्यूट्रल पीएच जीवाणू नियंत्रित करण्यास मदत करते. दुधात आढळणारा फॉस्फरस दातांचा इनॅमल टिकवून ठेवण्याचे काम करतो.

लठ्ठपणाचा धोका कमी होतो

दूध प्यायल्याने लठ्ठपणाची शक्यता कमी होते. अभ्यासात असे आढळून आले की ज्या मुलांनी दुधाचे सेवन केले त्यांचा लठ्ठपणा आणि वजन वाढण्याचा धोका 40 टक्क्यांनी कमी झाला.

कॅल्शियमचा उत्तम स्रोत

दुधाच्या प्रत्येक कपमध्ये सुमारे 300 मिलीग्राम कॅल्शियम असते. अनेक आरोग्य संस्था अशी शिफारस करतात की एखाद्या व्यक्तीने दररोज 2 ते 3 दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करावे. हाडांना पोषक तत्व देण्यासाठी हे पुरेसे आहे. एवढेच नाही तर ते दररोज 2 ग्लास दुधाच्या बरोबरीचे असते.

छातीत जळजळ टाळण्यासाठी उपयुक्त

दुधाचे सेवन केल्याने छातीत जळजळ होण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. दुध काही प्रकार छातीत जळजळ कमी करू शकतात.

 

Tags

follow us