World’s Top Ten Tourist Countries : सन 2024 साठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स जारी केला आहे. या यादीत 10 अशा देशांची नावे दिली आहेत जे पर्यटकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहेत. या यादीत सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. तर पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखला जाणारा स्वित्झर्लंड हा देश दहाव्या क्रमांकावर आहे. पर्यटनाच्या दृष्टीने लोकप्रिय असणाऱ्या देशांची यादी तयार करताना काही गोष्टी विचारात घेतल्या जातात. यामध्ये प्रवास आणि पर्यटनाला सातत्याने प्रोत्साहन देणाऱ्या देशांना प्राधान्य दिले जाते. या माध्यमातून संबंधित देशांच्या विकासातही योगदान दिले जाते.
2024 या वर्षासाठी या इंडेक्समध्ये एकूण 119 देशांचा समावेश करण्यात आला आहे. यातील आघाडीचे दहा देश असे आहेत जेथे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप जास्त आहे. या दहा देशांमध्ये अमेरिका 5.24 स्कोअरसह पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच स्पेन (5.18), जपान (5.09), फ्रान्स (5.07), ऑस्ट्रेलिया (5.00), जर्मनी (5.00), ब्रिटन (4.96), चीन (4.94), इटली (4.90) आणि स्वित्झर्लंड 4.81 स्कोअरसह दहाव्या क्रमांकावर आहे.
मालदीवचा पर्यटन उद्योग संकटात! भारतीय पर्यटकांनी फिरवली पाठ, पर्यटन संख्येत ३३ टक्के घट
या इंडेक्स मध्ये भारताचा नंबर 39 वा आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने सांगितले की भारताचे नैसर्गिक (सहावा), सांस्कृतिक (नववा), नॉन लिजर (नववा) संसाधने पर्यटन उद्योगाच्या वाढीसाठी चालना देतात. जगाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन उद्योगाचे मोठे योगदान आहे. लाखोंच्या संख्येत लोक दरवर्षी पर्यटनाला जात असतात. ज्यामुळे पर्यटन उद्योगाला मोठा फायदा मिळतो. वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलुक रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की सन 2024 मध्ये पर्यटन उद्योग 2.9 टक्क्यांनी वाढला होता तर 2023 मध्ये 3 टक्क्यांनी वाढला होता.
अमेरिकेत स्टॅच्यु ऑफ लिबर्टी, ग्रेन कॅनोन, ग्लेशियर नॅशनल पार्क, यलोस्टोन नॅशनल पार्क यांसारखी ठिकाणे प्रसिद्ध आहेत. सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजेलिस, न्यूयॉर्क यांसारख्या जगप्रसिद्ध शहरात फिरू शकता. सन 2023 मध्ये अमेरिकेला 8 कोटी पर्यटकांनी भेट दिली. यामुळे देशाच्या जीडीपीत 1.8 खरब डॉलरचे योगदान मिळाले.
वास्तू कलेसाठी स्पेन प्रसिद्ध आहे. स्पेनमध्ये तुम्ही बार्सिलोना, ग्रेनाडा यांसारख्या शहरात फिरू शकता. स्पेनमधील समुद्र किनारे प्रसिद्ध आहेत. सन 2023 मध्ये स्पेनमध्ये 7 कोटी पर्यटक आले होते. ज्यामुळे देशाच्या महसुलात 150 अब्ज डॉलर्सची भर पडली.
PM Modi यांच्या भेटीनंतर लक्षद्वीपच्या पर्यटनाला चालना; प्लॅटफॉर्म सर्चमध्ये 3,400 टक्क्यांनी वाढ
परंपरा आणि आधुनिक अविष्कारांचा संगम म्हणजे जपान. हा देश पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत आला आहे. क्योटो शहरातील मंदिर आणि टोक्यो शहरातील चकचकीत रस्ते जगभरात प्रसिद्ध आहेत. सन 2023 मध्ये जगभरातील 3 कोटी पर्यटकांनी जपानला भेट दिली. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला तब्बल 300 अब्ज डॉलर्सचा फायदा झाला.
आयकोनिक एफिल टॉवरचा देश फ्रान्स देश विदेशातील पर्यटकांत प्रसिद्ध आहे. येथील Provence क्षेत्रातील गावांची गणती जगातील सर्वाधिक सुंदर गावांमध्ये होते. दरवर्षी जपान मध्ये 8 कोटी पर्यटक येतात ज्यामुळे सरकारच्या तिजोरीत 200 अब्ज डॉलर्सची भर पडते.
नैसर्गिक सौंदर्य आणि विविध जंगली जनावरांच्या ऑस्ट्रेलिया या देशात दरवर्षी हजारो पर्यटक हजेरी लावतात. सिडनी, मेलबर्न सारख्या शहरांत फिरणे तुम्हाला एक वेगळाच अनुभव देतो. सन 2023 या वर्षात ऑस्ट्रेलियात 80 लाख पर्यटक आले होते ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला 60 अब्ज डॉलर्सचा फायदा झाला होता.