Marak Zuckerberg Tweet After 11 years : ट्विटरचे मालक आणि फेसबुकचा मार्क झुकरबर्ग हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चे असतात. आज पुन्हा मार्क झुकेरबर्ग चर्चेत आला असून, त्याने तब्बल 11 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर पहिले ट्विट केले आहे. यात त्याने ट्विटरचा मालक एलॉन मस्कला ट्रोल केले आहे. मार्कने नुकतेच नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Threads लाँच केले असून, ह एक टेक्स्ट आधारित अॅप आहे. थ्रेड्स ट्विटर सारखेच असून, यूजर्सना फॉलो करण्याचा आणि पुन्हा थ्रेड करण्याचा पर्याय यात देण्यात आला आहे. मार्कचे हे अॅप लॉन्च झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत 2 दशलक्ष लोकांनी हे डाउनलोड केले आहे.
— Mark Zuckerberg (@finkd) July 6, 2023
2009 मध्ये ट्विटरवर झाला जॉईन
मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्गने 2009 मध्ये ट्विटर जॉईन केले होते. त्यानंतर तो बरेच दिवस ट्विटरवर सक्रिय नव्हता. त्यांचे शेवटचे ट्विट 18 जानेवारी 2012 रोजी होते आणि त्यानंतर त्यांनी आज म्हणजेच 6 जुलै रोजी ट्विट केले आहे. यात त्याने एक फोटो ट्विट केला आहे ज्यामध्ये दोन स्पायडरमॅन दिसत आहेत.
11 वर्षांनंतर फोटो केला शेअर
मार्क झुकरबर्गने 11 वर्षांनंतर ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने एक स्पायडरमॅन दुसऱ्या स्पायडरमॅनकडे बोट दाखवत असल्याचे दिसून येत आहे. हा फोटो बारकाईने पाहिल्यास मार्क ट्विटरचा मालक मस्कला ट्विटरचा स्पर्धक बाजारात आल्याचे एकदृष्टीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मार्कचे हे ट्विट आतापर्यंत 60 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे आणि ट्विटरवर थ्रेडही ट्रेंड करत आहेत.
मस्ककडून बंदी
एकीकडे मार्कने थ्रेड अॅप बाजारात आणून एकप्रकारे मस्कला चॅलेंज दिले आहे. कारण काही दिवसांपूर्वी मस्कने ब्लू टिक्स असलेले यूजर्स दररोज 6000 पोस्ट पाहू किंवा वाचू शकतील, तर ब्लू टिक नसलेल्यांसाठी ही मर्यादा फक्त 600 पोस्ट्सपर्यंत आहे. मोठ्या प्रमाणावर डेटा चोरी आणि यंत्रणेतील फेरफार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेली ही एक तात्पुरती व्यवस्था असल्याचेही मस्कने स्पष्ट केले आहे. त्यानंतर ट्विटर यूजर्समध्ये घट झाल्याचे चित्र असून, मास्टोडॉन, ब्लूस्की आणि स्पिलचे वापरकर्ते सातत्याने वाढत आहेत.