Download App

Superfoods For Women : तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी, महिलांनी आहारात ‘या’ पदार्थाचा समावेश करावा

  • Written By: Last Updated:

मुंबई : दिवसभराच्या गडबडीत महिला स्वतःची काळजी घेणे विसरतात. परंतु स्वयंपाकघरात असलेल्या काही गोष्टींचे सेवन करून तुम्ही तुमचा मूड आणि आरोग्याची काळजी घेऊ शकता. शारिरीक आरोग्य आणि मानसिक आरोग्य नीट ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुमचे शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही व्यस्त वेळापत्रकातही स्वतःची काळजी कशी घेऊ शकता.

अंजीर

अंजीरामुळे फेरोमोन स्राव आणि प्रजनन क्षमता वाढते .तसेच अंजीरमध्ये अमीनो ऍसिडचे प्रमाण जास्त असते. विशेषतः हिवाळ्यात अंजीर खाणे खूप फायदेशीर मानले जाते. जर तुम्हाला काहीतरी गोड खावेसे वाटत असेल आणि लठ्ठपणाच्या भीतीने ते खाणे अशक्य असेल तर अंजीर खाणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

ब्रोकोली

तुमच्या सॅलडमध्ये किंवा तुमच्या नेहमीच्या जेवणासोबत काही व्हिटॅमिन सी युक्त ब्रोकोली खा, मग ती कच्ची, तळलेली किंवा शिजवलेली असो. विशेष म्हणजे ब्रोकोली हा महिलांसाठी सर्वोत्तम पदार्थांपैकी एक आहे. अवयवांमध्ये रक्तप्रवाहासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. ब्रोकोलीपासून बनवलेले पराठे तुम्ही खाऊ शकता. हे आरोग्यासाठी खूप चांगले आहे.

लवंग

लवंगाची चव खायला चांगली नसली तरी लवंग आरोग्यासाठी उत्तम आहे. लवंग श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी ओळखली जाते, तुम्ही तुमच्या जेवणावर थोडी लवंग पावडर शिंपडूनही याचे सेवन करू शकता. किंवा लवंगचहामध्ये टाकून खाऊ शकतात

केशर

केशर तुमच्या पोटासाठीही खूप फायदेशीर आहे, केशर15 मिनिटे उकळत्या दुधात किंवा पाण्यात भिजवून ठेवा आणि नंतर केशरचे दूध प्या. हिवाळ्यात केशरचा वापर तुमच्यासाठी फायदेशीर आहे.

अंडी

अंड्यांमध्ये जीवनसत्त्वे B5 आणि B6 भरपूर प्रमाणात असतात. अंडी खाल्ल्याने हार्मोन्स संतुलित राहतात तसेच तणावही कमी होतो. अंड्यांमध्ये कॅलरीज कमी असतात आणि प्रथिने भरपूर असतात, जे शारीरिक शक्तीचा स्रोत आहे. अंडी तुम्ही अनेक प्रकारे वापरून खाऊ शकता. ब्रेड ऑम्लेट किंवा अंड्याचा पराठा हा नाश्त्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो.

Tags

follow us