Download App

मेष, मिथुन आणि तुळ राशिसाठी शुभ तर इतर राशींचं काय? जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Horoscope : 5 ऑगस्ट या दिवसाचं राशीभविष्य मेष मिथुन आणि तुळ राशिसाठी शुभ फलदायी असणार आहे. आज चंद्र ज्येष्ठतून धनु राशीमध्ये होणार आहे.

Todays Horoscope 5 August 2025 : 5 ऑगस्ट या दिवसाचं राशीभविष्य मेष मिथुन आणि तुळ राशिसाठी शुभ फलदायी असणार आहे. आज चंद्र ज्येष्ठा नक्षत्रातून धनु राशीमध्ये होणार आहे. तसेच चंद्रावर धनु राशीचा स्वामी गुरू समसप्तक दृष्टी राहिलं. या योगामुळे मेषपासून मीनपर्यंत सर्वांनाच आजचा दिवस शुभफलदायी ठरणार आहे. त्यामुळे जाणून घेऊ आजचं राशीभविष्य सविस्तर…

मेष – या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस दुपारनंतर चांगला असणार आहे. चंद्राच्या भ्रमणामुळे तुम्हाला भाग्य उजळल्याची अनुभती मिळेल. त्यामुळे तुम्ही ज्या कामात हात घालाल त्यात यश निश्चित आहे. मात्र नोकरीच्या ठिकाणी दबाव निर्माण होणार आहे. त्यामुळे तत्परतेने काम करा. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. तर अर्थिक स्थिती जेमतेम असल्याने आज खर्चांवर नियंत्रण ठेवा.

वृषभ – या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस जेमतेम असणार आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात आजची कामं पुर्ण करण्यावर भर द्या. कारण दुपारनंतर गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. आजचे ग्रहमान काहीचे विपरित असल्याने काही अडचणींचा समाना करावा लागू शकतो. तसेच आज बाहेरील खाण्यापिण्यापासून सावध राहा कारण आज आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात.

मिथुन- या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. कुटुंबामध्ये सामंजस्याचं वातावरण असेल. आज एखाद्या मित्राची अनपेक्षित साथ मिळेल. तर प्रेम प्रकरणांमध्ये आजचा दिवस मिथुन राशीसाठी अनुकूल असणार आहे. तर व्यवसायामध्ये एखादी चांगली डील मिळण्याची शक्यता आहे. तर सायंकाळ देखील खास असणार आहे. कारण तुम्हाला तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळू शकते.

कर्क – या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. त्यांना त्यांच्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. त्यामुळ आज ही लोक आनंदात असणार आहेत. मात्र तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रातील शत्रुंपासून सावध राहणं गरजेचं आहे. कारण आजचे ग्रहमान हे तुमच्या राशीसाठी दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला किंवा काही दगाफटका होण्याची शक्यता आहे.

सिंह – या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस मंगलमय असा असणार आहे. आज तुम्हाला नवं तंत्रज्ञान शिकायला मिळू शकतं. आज घरात एखादं मंगलकार्य होण्याची किंवा ठरण्याची शक्यता आहे. तर प्रेम आणि वैवाहिक जीवनात आजचा दिवस शुभ असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं पुर्ण सहकर्य मिळेल. तर अर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल असून तुमच्या संपत्तीत वाढ होऊ शकते.

कन्या – या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असेल. दिवसाच्या दुसऱ्या भागात चंद्राच्या भ्रमणाने सुख साधनांचा लाभ मिळेल. कुटुंबासोत खास वेळ घालवण्याची संधी मिळेल . आज तुमच्यासाठी खास जेवनाचा बेत आखला जाऊ शकतो. तसेच मित्र किंवा नातेवाईंकांकडून आज तुम्हाला भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे.

तुळ – या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आणि अनुकूल असणार आहे. तुम्ही आज तुमच्या स्पर्धकांवर मात करत तुमच्या कार्यक्षेत्रात विजय मिळवू शकता. आज कुटुंबाकडून तुम्हाला योग्य साथ मिळेल. तर आज इलेक्ट्रीक गॅझेट्सपासून तुम्हाला लाभ मिळू शकतो.

वृश्चिक – या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस अगदी जेमतेम असणार आहे. दिवसाच्या सुरूवातीला काहीसा तणाव निर्माण करणारं वातावरणं असू शकतं. तर दिवसाच्या दुसऱ्या भागामध्ये मात्र तुम्हाला लाभा आणि आनंद मिळू शकतो. तसेच आज तुमचे बऱ्याच दिवसांपासून खोळंबलेले काम आटोपू शकते.

धनु – या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. यामध्ये यश आणि लाभ मिळण्याची शक्यता आहेय तुम्ही आज तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम करून झळकाल. तुम्हाला आज तुमच्या वरिष्ठांकडून शाबासकी मिळण्याची शक्यता आहे. तसेच एखादी नवी जबाबदारी मिळण्याची देखील शक्यता आहे.

मकर – या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस मिश्र स्वरूपाचा असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस काहीचा गोंधळ निर्माण करणारा असणार आहे. त्यामुळ तुम्हाला तुमच्या कामावर लक्षकेंद्रीत करावं लागणार आहे. मात्र तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पुर्ण सहकार्य मिळणार आहे.

कुंभ – या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस एकंदरीत अनुकूल असणार आहे. तुम्ही आज तुमच्या कार्यक्षेत्रात व्यस्त असणार आहेत. तसेच दिवसाच्या दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तर अर्थिक बाबींमध्ये आज तुम्हाला काटकसर करावी लागणार आहे. तर वैवाहिक जीवनात आज तुम्हाला नवी संधी मिळू शकते.

मीन – या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत खासणार आहे. तुम्ही आज तुमच्या कार्यक्षेत्रात कष्ट आणि कुशलतेने पुर्ण लाभ मिळेल. आज कुटुंबातील एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे. त्यातून समस्यांचं निवारणं होण्यास मदत होणार आहे. तर आज कुटुंबासोबत खास वेळ घालवायला मिळू शकतो.

follow us