Toyota Fortuner Leader Edition लॉन्च; सिग्नेचर फ्रंट ग्रिलसह भन्नाट फीचर्स; जाणून घ्या किंमत…

Toyota Fortuner Leader Edition :  भारतीय बाजारात टोयोटाने पुन्हा एकदा मोठा धमाका करत आपली नवीन लोकप्रिय एसयूव्ही  'फॉर्च्युनर' ची

Toyota Fortuner Leader Edition

Toyota Fortuner Leader Edition

Toyota Fortuner Leader Edition :  भारतीय बाजारात टोयोटाने पुन्हा एकदा मोठा धमाका करत आपली नवीन लोकप्रिय एसयूव्ही  ‘फॉर्च्युनर’ ची नवीन’ 2026 लीडर एडिशन’ लॉन्च केली आहे. कंपनीने या एसयूव्हीमध्ये कॉस्मेटिक बदल केले आहे.  एसयूव्हीच्या केबिनमध्ये  ‘अँबियंट लाइटिंग’ची सुविधा देण्यात आली आहे.  नवीन टोयोटा फॉर्च्युनर लीडर एडिशनची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 36.51 लाख रुपये आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या एसयूव्हीसाठी 12 ऑक्टोबरपासून बुकिंग सुरु होणार आहे.

Toyota Fortuner Leader Edition  किंमत

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, टोयोटा फॉर्च्युनर 2026 लीडर एडिशनच्या 4×2 मॅन्युअल व्हेरिएंटची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 36.51 लाख रुपये आहे, तर 4×2 ऑटोमॅटिक व्हेरिएंटची किंमत 38.72 लाख रुपये आहे.

एक्सटीरियर बदल

नवीन फॉर्च्युनरचे एक्सटीरियर मागील मॉडेलसारखेच (Toyota Fortuner Leader Edition) असले, तरी यात ‘ब्लॅक थीम’वर आधारित काही डिझाइन समाविष्ट करण्यात आले आहेत. या एसयूव्हीमध्ये सिग्नेचर फ्रंट ग्रिल, बॅक डोरवर ब्लॅक रंगाचे गार्निश, ग्लॉसी ब्लॅक अलॉय व्हील्स आणि त्याला साजेसे हब कॅप्स देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, यात ब्लॅक रंगाचे रूफ आणि फिनिशसह अँटेना देण्यात आला आहे. मागील मॉडेलच्या तुलनेत ग्रिल पॅटर्न, हेडलाइट्स, फ्रंट बंपर एक्सटेंशन्स, सिल्व्हर ॲक्सेंट्स, बोनेटवरील अक्षरे किंवा अलॉय व्हील डिझाइनमध्ये कोणतेही मोठे बदल केलेले नाहीत. ही एसयूव्ही तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल: सुपर व्हाईट, प्लॅटिनम व्हाईट पर्ल आणि ॲटिट्यूड ब्लॅक.

केबिनमध्ये अँबियंट लाइटिंगची भर

इंटिरियरमध्ये ड्युअल-टोन रंगाचे सीट अपहोल्स्ट्री देण्यात आले आहे आणि हीच रंगसंगती डोरच्या पॅनेलवरही दिसून येते. या नवीन एसयूव्हीमध्ये ‘अँबियंट लाइटिंग’चा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे केबिनला एक वेगळा लूक मिळतो. याशिवाय, गाडीमध्ये ऑटो-फोल्डिंग ORVMs (बाह्य रिअर-व्ह्यू मिरर्स) आणि TPMS (टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम) सारखी फीचर्स देण्यात आली आहेत.

एकनाथ शिंदेंना धक्का, बडा नेता करणार पुन्हा ठाकरे गटात प्रवेश ?

‘लीडर एडिशन’ केवळ 4×2 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध

स्टँडर्ड टोयोटा फॉर्च्युनरमध्ये 4×2 आणि 4×4 असे दोन्ही पर्याय उपलब्ध असले, तरी नवीन ‘लीडर एडिशन’ केवळ 4×2 मॅन्युअल आणि 4×2 ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्येच उपलब्ध आहे. याचा अर्थ असा की, या एडिशनमध्ये 4×4 ड्राइव्हट्रेनचा पर्याय देण्यात आलेला नाही. यात 2.8-लिटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे, जे 204 hp ची पॉवर आणि 500 Nm पर्यंतचा टॉर्क निर्माण करते. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिकचा समावेश आहे. मॅन्युअल व्हेरिएंटमध्ये हे इंजिन 420 Nm टॉर्क निर्माण करते, तर ऑटोमॅटिक व्हेरिएंट 500 Nm टॉर्कची क्षमता देते.

Exit mobile version