Twitter Blue भारतात उपलब्ध होण्यास सुरुवात, तुम्हीही मिळवू शकता ट्विटरला ब्लू टिक

गेल्या काही महिन्यापासून ट्विटरची ट्विटर ब्लू (Twitter Blue) ही सेवा भारतात केव्हा सुरु होणार याची चर्चा होती. अखेर काल ट्विटरकडून (Twitter) भारतासाठी ही सेवा सुरु केली आहे. ट्विटरने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार ८ फेब्रुवारीपासून भारत, ब्राझील आणि इंडोनेशिया मध्ये ही सेवा नव्याने सुरु केली आहे. काय असेल किंमत ? सध्या ही सेवा सध्या वेबवर 650 रुपये […]

elon musk twitter_LetsUpp

elon musk twitter_LetsUpp

गेल्या काही महिन्यापासून ट्विटरची ट्विटर ब्लू (Twitter Blue) ही सेवा भारतात केव्हा सुरु होणार याची चर्चा होती. अखेर काल ट्विटरकडून (Twitter) भारतासाठी ही सेवा सुरु केली आहे. ट्विटरने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार ८ फेब्रुवारीपासून भारत, ब्राझील आणि इंडोनेशिया मध्ये ही सेवा नव्याने सुरु केली आहे.

काय असेल किंमत ?

सध्या ही सेवा सध्या वेबवर 650 रुपये मासिक आणि मोबाइल डिव्हाइसवर 900 रुपये प्रति महिना उपलब्ध आहे. पण Twitter कडून ऑफरमध्ये प्रतिवर्ष 6,800 रुपये मध्ये सवलतीचा वार्षिक प्लॅन ऑफर जाहीर केला आहे. त्यामुळे प्रतिमहिना 566.67 अशी किंमत आकारली जाईल.

iOS आणि Android मोबाईल डिव्हाइसवर Apple आणि Google द्वारे साधारणपणे 15-30% कमिशन फी आकारली जाते. त्यामुळे मोबाईलवर हा प्लॅन महाग पडेल.

ट्विटर ब्लूचे फायदे काय ?

नवीन ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन ऍक्टिव्ह केल्यांनतर युजर्सना ब्लू टिक आणि केलेले ट्विट् ईडीट करण्याची क्षमता, 60 मिनिटांपर्यंत (2GB साईज) मोठे व्हिडिओ पोस्ट करण्याची क्षमता, बुकमार्क आयोजित करणे, NFT प्रोफाइल जोडणे अशा सुविधा मिळणार आहेत.

Exit mobile version