Download App

ट्विटरचं टेन्शन वाढलं! इन्टाग्रामकडून नवं अ‍ॅप लाँच…

ट्विटरचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. ट्विटरला टक्कर देण्यासाठी इन्टाग्रामकडून नवीन अ‍ॅप लाँच होणार आहे. ‘थ्रेड्स’ असं या नवीन अ‍ॅपचं नाव असणार आहे. इन्टाग्रामचं हे नवीन अ‍ॅप अमेरिकेत iOS App Store दाखवण्यात आलं आहे. हे फिचर 6 जुलै रोजी लॉंच करण्यात येणार आहे.

भेटायला बोलावलं, गिफ्ट घेतले अन्… : बॉयफ्रेंडला लुटून, नग्नावस्थेत फेकून गर्लफ्रेंडचा पोबारा

या अ‍ॅपद्वारे युजर्स आपल्या आवडत्या क्रिएटरला फॉलो करुन कनेक्ट करु शकणार आहे. या अ‍ॅपच्या मदतीने युजर आपल्या कल्पना, कंटेटनूसार स्वत:लाही फॉलोवर्स बनवू शकणार आहे. या अ‍ॅपला इन्टाग्रामवरुन कनेक्ट होता येणार आहे.

WTC Points Table: सलग दोन विजयांसह ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या स्थानावर, इंग्लंडसाठी धोक्याची घंटा

युजर या अ‍ॅपला एका स्टॅंडलोन अ‍ॅपसारखं वापरु शकणार आहे. या अ‍ॅपबद्दल अधिक माहिती समोर आलेली नसून रिपार्टनूसार या अ‍ॅपमध्ये लाईक, कमेंट, रिपोस्ट, शेअरचे ऑप्शन कंपनीकडून देण्यात येणार आहेत.

‘अजित पवार निधी देत नव्हते, मग आता सोबत कसे? मुख्यमंत्र्यांनी थेटच सांगितलं…

App Store वर उपलब्ध असलेल्या स्क्रिनशॉटद्वारे या अ‍ॅपमध्ये युजर्सला टॉगलही मिळणार आहे. यासाठी युजर्सला अ‍ॅपमधील everyone, people you follow और only those mentioned in the post हे ऑप्शन मिळणार आहे.

एलन मस्क यांनी ट्विटरवर युजर्ससाठी पोस्ट वाचण्यासाठी मर्यादा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच युजर्स ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शन चार्जमुळे युजर्स तोडले जात आहेत. आता ट्विटरच्या ट्विटडेक वापरण्यासाठी वेरीफाईड अकाऊंट असणं गरजेचं आहे. पुढील 30 दिवसांत हा बदल करण्यात येणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

Tags

follow us