Download App

UPSC Recruitment : 45 पदांसाठी थेट भरती अन् लाखात पगार; खाजगी नोकदारही करू शकणार अर्ज

केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये सहसचिव (Joint Secretary) आणि संचालक स्तरावरील 45 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली

  • Written By: Last Updated:

UPSC Recruitment : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC Recruitment) विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये सहसचिव (Joint Secretary) आणि संचालक स्तरावरील 45 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 सप्टेंबर आहे. तीन वर्षांच्या कालावधीसाठी ही पदे करार तत्वावर भरली जाणार आहेत. दरम्यान, याच पद भरतीविषयी सविस्तर जाणून घेऊ.

‘लाडका भाचा स्पर्धा परिक्षा योजना’ सुरु करा, MPSC व IBPS परिक्षांवरून अतुल लोंढे सरकारवर भडकले 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या upsconline.nic.in या अधिकृत वेबसाइटवर भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहसचिव आणि संचालक/उपसचिव या 45 पदांसाठी ही भरती होत आहे. या भरतीअंतर्गत केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये/विभागांमध्ये पात्र उमेदवारांची थेट भरती होणार आहे. खाजगी नोकरी करणारे लोक देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

सहसचिव पदासाठी वयोमर्यादा?

सहसचिव पदासाठी किमान आणि कमाल वयोमर्यादा अनुक्रमे 40 आणि 55 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

वेतन किती असेल?
महागाई भत्ता, वाहतूक भत्ता आणि घरभाडे भत्ता यासह एकूण पगार सुमारे 2,70,000 रुपये असेल.

उपसचिव पदासाठी वयोमर्यादा आणि वेतन किती असेल?
उपसचिव स्तरावरील पदासाठी किमान आणि कमाल वयोमर्यादा अनुक्रमे 32 आणि 40 वर्षे निश्चित करण्यात आली आहे आणि अंदाजे 1,52,000 रुपये वेतन दिले जाईल.

संचालक पदासाठी वयोमर्यादा आणि वेतन?

संचालक स्तरावरील पदासाठी किमान आणि कमाल वयोमर्यादा अनुक्रमे 35 आणि 45 वर्षे असून एकूण 2,32,000 रुपये वेतन दिले जाईल.

अर्ज करण्यासाची अंतिम तारीख- 17 सप्टेंबर 2024

अर्ज करण्यासाठी वेबसाईट – https://www.upsconline.nic.in

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

कोण अर्ज करू शकतो अर्ज?

सहसचिव स्तरावरील पदांसाठी 15 वर्षांचा, संचालक पदासाठी 10 वर्षे आणि उपसचिव पदासाठी 7 वर्षांचा कामाचा अनुभव असणे बंधनकारक आहे. यासाठी राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशातील समकक्ष पदांवर सरकारी नोकरी करणारे अधिकारी अर्ज करू शकतात. या व्यतिरिक्त, PSU, स्वायत्त संस्था, वैधानिक संस्था, विद्यापीठे, मान्यताप्राप्त संशोधन संस्था, खाजगी कंपन्या, आंतरराष्ट्रीय/MNC मध्ये काम करणारे लोक देखील या पदांसाठी अर्ज करू शकतात.

जेव्हा संधी मिळेल तेव्हा सावत्र भावांना जोडे दाखवा, CM शिंदेचं बहिणींना आवाहन 

कोणती पदे भरली जाणार…
1- सहसचिव (इमर्जिंग टेक्नोलॉजी)
2- सहसचिव (सेमीकंडक्टर अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स)
3. सहसचिव (पर्यावरण धोरण आणि पर्यावरण कायदा)
4- सहसचिव (डिजिटल इकॉनॉमी, फिन टेक आणि सायबर सुरक्षा)
5- सहसचिव (गुंतवणूक)
6- सहसचिव (नीती आणि योजना), NDMA
7- सहसचिव (शिपिंग)
8- सहसचिव (विज्ञान आणि तंत्रज्ञान)
9- सहसचिव (आर्थिक/व्यावसायिक/औद्योगिक)
10- सहसचिव (रिन्यूएबल एनर्जी)
11- संचालक/उपसचिव (हवामान बदल आणि मृदा संवर्धन)
12- संचालक/उपसचिव (क्रेडिट)
13- संचालक/उपसचिव (वनीकरण)
14- संचालक/उपसचिव (एकात्मिक पोषक व्यवस्थापन)
15- संचालक/उपसचिव (नैसर्गिक शेती)
16- संचालक/उपसचिव (नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन/पाऊसावर आधारित शेती प्रणाली)
17- संचालक/उपसचिव (सेंद्रिय शेती)
18- संचालक/उपसचिव (जल व्यवस्थापन)
19- संचालक/उपसचिव (विमान वाहतूक व्यवस्थापन)
20- संचालक/उपसचिव (रसायन आणि पेट्रोकेमिकल्स)
21- संचालक/उपसचिव (कमोडिटी प्राइसिंग)
22- संचालक/उपसचिव (Insolvency and Bankruptcy)
23- संचालक/उपसचिव (शिक्षण कायदे)
24- संचालक/उपसचिव (शिक्षण तंत्रज्ञान)
25- संचालक/उपसचिव (आंतरराष्ट्रीय कायदा)
26- संचालक/उपसचिव (अर्थशास्त्रज्ञ)
27- संचालक/उपसचिव (कर धोरण)
28- संचालक/उपसचिव (उत्पादन-ऑटो)
29- संचालक/उपसचिव (उत्पादन-ऑटो सेक्टर (ACC बॅटरी)
30- संचालक/उपसचिव (तांत्रिक)
31- संचालक/उपसचिव (शहरी जल व्यवस्थापन)
32- संचालक/उपसचिव (डिजिटल मीडिया)
33- संचालक/उपसचिव (समन्वय व व्यवस्थापन)
34- संचालक/उपसचिव (तांत्रिक)
35- संचालक/उपसचिव (वॉटर सैनिटेशन एंड हाइजीन (WASH) सेक्टर)
36- संचालक/उपसचिव (वित्त क्षेत्र कायदा)
37- संचालक/उपसचिव (आंतरराष्ट्रीय कायदा)
38- संचालक/उपसचिव (सेवा कायदे)

39- संचालक/उपसचिव (माहिती तंत्रज्ञान)
40- संचालक/उपसचिव (लीगल)
41- संचालक/उपसचिव (कंत्राटी व्यवस्थापन)
42- संचालक/उपसचिव (वेलफेयर)
43- संचालक/उपसचिव (समाज कल्याण कार्यक्रम आणि उपक्रम)
44- संचालक/उपसचिव (माहिती तंत्रज्ञान)
45- संचालक/उपसचिव (आर्थिक/व्यावसायिक/औद्योगिक)

follow us