MPSC Exam 2024 : MPSC व IBPS च्या परीक्षा एकाच दिवशी असल्याने हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग युवकांचे आयुष्य घडवणारे आहे की त्यांची कत्तल करणारा जनावरांसारखा कत्तलखाणा आहे असा सवाल काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी उपस्थित केला आहे. IBPS ने 18 व 25 ऑगस्ट रोजी देशपातळीवर परीक्षा आयोजित केले आहे तर त्याच दिवशी राज्यात MPSC कडून देखील परीक्षा आयोजित करण्यात आले आहे, त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे त्यामुळे आयोगाने या तारखांमध्ये बदल करावा अन्यथा आम्ही उच्च न्यायालयात दाद मागू असा इशारा देखील काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.
माध्यमांशी बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, आयोगाने परीक्षांच्या तारखा ठरवताना UPSC/IBPS/ Staff Selection commission च्या परिक्षांच्या तारख्यांचा अंदाज तारखा जाहीर करायला पाहिजे होते पण आयोगाने त्याची दखल घेतली नाही. त्यामळे एमपीएससी विद्यार्थ्यांवर सुड उगवण्याचे काम आयोगाकडून होत आहे. आयोगाकडून जागा निघत नाही आणि जर जागा निघाल्या तर त्याचे नियोजन व्यवस्थित होत नाही अशी टीका अतुल लोंढे यांनी माध्यमांशी बोलताना केली.
पुढे ते म्हणाले की, आयोगाने फक्त रविवारीच परीक्षा घ्यावी असा काही नियम नाही, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून परिक्षांच्या तारखा ओव्हरलॅप होत असल्याने आयोगाच्या परिक्षांची तारिख बदलण्याचे निर्देश दिले, जर हे कर्नाटक सरकार करू शकते तर महाराष्ट्र सरकार का करू शकत नाही असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला तसेच ही सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे असा दावा मुख्यमंत्री शिंदे करत असतात तर त्यांच्या नाकाखाली एमपीएससी मनमानी कारभार करत आहे त्यात त्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे असं देखील ते यावेळी म्हणाले.
आयोगाकडून 202 जागांवर ऍग्रिकल्चर संवर्गातील विद्यार्थ्यांची निवड झाली मात्र अद्याप त्यांना नियुक्त्या मिळाले नाही आणि आता त्याच कृषी संवर्गातील 258 जागांची मागणी सरकारने आयोगाकडे केली आहे पण आयोगाने त्या संवर्गाची लिंकच ओपन केलेली नाही, त्यामुळे 25 तारखेला जी परिक्षा होत आहे ती होऊ नये अशी मागणी आम्ही करत आहोत असेही अतुल लोंढे म्हणाले.
आज आपल्या राज्यात एमपीएसी परिक्षा उत्तिर्ण होऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणारे ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने आहे मात्र आयोगाला विद्यार्थ्यांच्या हिताशी काहीही देणेघेणे नाही.
‘तेव्हापर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही’, फडणवीसांकडून मोठी घोषणा, लाखो महिलांना दिलासा
आज आयोग आडमुठी भूमिका घेऊन त्यांचे स्वप्न चुराडा करण्याचे पाप करत आहे. सरकारने लाडकी बहिण योजना काढली आहे तशीच लाडका भाचा स्पर्धा परिक्षा योजनाही काढावी असा टोला देखील त्यांनी महायुती सरकारला यावेळी लावला.