Download App

महापारेषण पिंपरी चिंचवड येथे नोकरीची संधी, 23 पदांसाठी भरती सुरू, कोण करू शकतं अर्ज?

महापारेषण म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने भरती प्रक्रिया सुरू केली. पिंपरी चिंचवड येथे ही पदे भरली जाणार आहेत

  • Written By: Last Updated:

Mahapareshan recruitment 2024 : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नुकतीच महापारेषण (Mahapareshan) म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने भरती प्रक्रिया सुरू केली. महापारेषण अंतर्गत पिंपरी चिंचवड येथे ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीअंतर्गत शिकाऊ उमेदवारांची (इलेक्ट्रिशियन) (Apprentice Electrician) पदांची एकूण 23 पदे भरली जाणार आहेत. दरम्यान, या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? शैक्षणिक पात्रता काय? वयोमर्यादा किती आहे? याच विषयी जाणून घेऊ.

Bhool Bhulaiyaa 3 : कार्तिकच्या ‘भूल भुलैया 3’ बाबत मोठी अपडेट, दिवाळीत होणार धमाका 

दरम्यान, या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज करता येणार आहे.

पदाचे नाव – महापारेषण पिंपरी चिंचवड पुणे अंतर्गत शिकाऊ (इलेक्ट्रीशियन)

पदांची संख्या – 23

शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार (इलेक्ट्रीशियन) उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग (NCTVT), नवी दिल्ली द्वारे मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून इलेक्ट्रिकलमधील व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण – पुणे

वयोमर्यादा – महापारेषण पिंपरी चिंचवड पुणे अंतर्गत शिकाऊ (इलेक्ट्रीशियन) पदासाठी उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्षे असावे.

अर्ज पद्धत – महापारेषण पिंपरी चिंचवड पुणे अंतर्गत शिकाऊ (इलेक्ट्रीशियन) पदासाठी ऑनलाइन/ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 03 ऑक्टोबर 2024 आहे.

अर्जाची प्रत पाठवण्याची तारीख – 05 ऑक्टोबर 2024 आहे.

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता कार्यालय म. रा. वि. पारेषण कंपनी मर्यादित, अ.उ.दा. संवसु विभाग, पिंपरी चिंचवड, 220 के. व्ही उपकेंद्र चिंचवड जवळ, बिजली नगर, चिंचवड पुणे 411033.

Bhool Bhulaiyaa 3 : कार्तिकच्या ‘भूल भुलैया 3’ बाबत मोठी अपडेट, दिवाळीत होणार धमाका 

अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in

आवश्यक कागदपत्रांची यादी –
1) S.S.C. मार्कशीट/प्रमाणपत्र
2) आयटीआय मार्कशीट (चारही सेमिस्टर)
3) जात प्रमाणपत्र / जात वैधता प्रमाणपत्र (असल्यास)
4) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी EWS प्रमाणपत्र
5) आधार कार्ड
6) शाळा सोडल्याचा दाखला.

दरम्यान, उमेदवार शिकाऊ (इलेक्ट्रीशियन) पदासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. त्यानंतरच अर्ज करावा. कारण, चुकीची माहिती भरल्यास अर्ज फेटाळल्या जाईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. महत्वाचं म्हणजे, दिलेल्या मुदतीच उमेदवारांनी अर्ज करावा. अन्यथा अर्ज नाकारल्या जाईल.

follow us