SBI Recruitment For Sportspersons: तुम्ही देखील देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India) नोकरी (Job) करण्याची संधी शोधत असाल तर तुमच्याठी आता एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अनेक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. एसबीयाने अधिकारी (खेळाडू) आणि लिपिक (Clerk) (खेळाडू) या पदांसाठी ही भरती मोहीम जाहीर केली आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क याच विषयी तपशीलवार माहिती जाणून घ्या.
पूजा खेडकर नवीन प्रकरणामुळे चर्चेत, पालिकेचा इशारा, नाहीतर संपत्तीचा होणार लिलाव
या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार https://sbi.co.in/ या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करू शकतात. या अर्ज प्रक्रियेअंतर्गत, उमेदवारांनी प्रथम आपली नाव नोंदणी करणे आवश्यक आहे आणि त्यानंतर नोंदणी केलेल्या सगळ्या तपशीलांसह लॉग इन करून रिक्त पदांसाठी अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे.
पदांचा तपशील –
स्टेट बँक ऑफ इंडियाने शेअर केलेल्या अधिसूचनेनुसार, या भरती मोहिमेद्वारे एकूण 68 रिक्त जागा भरल्या जातील.
अधिकारी- 17 पदे
लिपिक – 51 पदे
पगार –
अधिकारी पदासाठी निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना 85,920 रुपये प्रति महिना वेतन मिळेल. तर तर लिपिक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 64,480 रुपये वेतन दिले जाईल.
Varvarche Vadhu Var: अमर फोटो स्टुडिओ नंतर ‘वरवरचे वधू वर’ या नाटकात सखी सुव्रत दिसणार एकत्र!
वयोमर्यादा-
अधिकारी पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे आणि लिपिक पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावे.
शैक्षणिक पात्रता –
वरील पदांसाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा. तसेच उमेदवारांनी गेल्या तीन वर्षांत क्रीडा क्षेत्रातील कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेले असावे.
अर्ज शुल्क-
अधिकृत अधिसूचनेनुसार उमेदवारांना अर्जाची फी ऑनलाइन भरावी लागेल. सामान्य, EWS आणि OBC उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 750 रुपये आहे; SC, ST आणि PWD उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.
या पदांसाठी फक्त खाली नमूद केलेल्या खेळातील खेळाडूंनाचा नोकरीची ही संधी आहे-
बास्केटबॉल
क्रिकेट
फुटबॉल
हॉकी
व्हॉलीबॉल
कबड्डी
टेबल टेनिस
बॅडमिंटन
अधिसूचना लिंक –https://sbi.co.in/documents/77530/43947057/230724-1_Detailed+ADD_23.07.2024_Sportsperson.pdf/237658d5-4c74-5e64-f412-3c93274593c9374858t?
शेवटची तारीख:
अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 14 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकता.