Varvarche Vadhu Var: अमर फोटो स्टुडिओ नंतर ‘वरवरचे वधू वर’ या नाटकात सखी सुव्रत दिसणार एकत्र!

Varvarche Vadhu Var: अमर फोटो स्टुडिओ नंतर ‘वरवरचे वधू वर’ या नाटकात सखी सुव्रत दिसणार एकत्र!

Varvarche Vadhu Var: हल्लीची पिढी त्यांच्या गोष्टी आणि यातून घडणारी गंमत दाखवण्यासाठी सखी सुव्रत एक नवं कोर नाटक घेऊन पुन्हा रंगभूमीवर परतणार आहेत. (Varvarche Vadhu Var Natak) अमर फोटो स्टुडिओ नंतर हे दोघे पुन्हा एकदा या नाटकात एकत्र काम करणार असून (Marathi Natak) या नाटकाची गोष्ट देखील तितकीच खास आहे. “वरवरचे वधू वर” अस या नाटकाचं नाव असून ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sakhi Gokhale (@sakheeg)


सखी गोखले (Sakhi Gokhale) आणि सुव्रत जोशी (Suvrat Joshi) ही जोडी कायम प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे. दुनियादारी मालिकेतून एकत्र काम करून यांची जोडी (Varvarche Vadhu Var Natak)अमर फोटो स्टुडिओ मध्ये दिसली होती आणि आता पुन्हा सखी सुव्रत नव्या नाटकासाठी एकत्र येणार आहेत. या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन विराजस कुलकर्णी याने केलं असून सखी आणि सुव्रत ने सोशल मीडिया वर या बद्दल ची पोस्ट शेयर करून ही खास गोष्ट प्रेक्षकांना सांगितली.

‘वरवरचे वधू वर’ या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन विराजस कुलकर्णी याने केलं असून सखी आणि सुव्रत ने सोशल मीडियावर याविषयाची पोस्ट शेअर करून ही खास गोष्ट प्रेक्षकांना सांगितली आहे. ही शेअर केलेली पोस्ट पाहून चाहत्यांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला आहे. चाहते या दोघांना पुन्हा रंगमंचावर एकत्र पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

Marathi Natak: पुन्हा रंगभूमीवर धुडगूस घालणार मोहन जोशी आणि सविता मालपेकर गाजवणार रंगमंच

सखीने नव्या नाटकाची पोस्ट करत लिहिलं ” वरवरचे – वधू वर बिन प्रेमाची लव स्टोरी ” आता नाटकाचा विषय नक्की काय असणार ? अजुन कोण कलाकार यातून दिसणार ? आणि हे नाटक कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळतील असं देखील तिने सांगितलं आहे. प्रेक्षक या जोडीला पुन्हा एकत्र बघण्यासाठी उत्सुक आहेत आणि सखी सुव्रत यांची ही बिन प्रेमाची भानगड नक्की काय असणार हे अनुभवण्यासाठी आतुर आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube