स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदासाठी भरती सुरू, कधीपर्यंत करता येणार अर्ज?

स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदासाठी भरती सुरू, कधीपर्यंत करता येणार अर्ज?

SBI recruitment 2024: तुम्ही देखील देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्य (State Bank of India) नोकरीची संधी शोधत असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, स्टेट बँक ऑफ इंडियाने अनेक रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर भरतीबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली.

‘गट फुटला म्हणून पवार कुटुंबात फूट नाही’; पवारांच्या बहिण सरोज पाटलांनी थेट सांगितलं 

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत प्रमुख – कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स आणि मार्केटिंग (Corporate Communications and Marketing)या पदासाठी भरती होत आहेत. या पदावर काम करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. दरम्यान, या भरतीसाठी अर्ज कसा करावा? शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? याच विषयी जाणून घेऊ.

रिक्त जागा आणि पदांची संख्या
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि मार्केटिंग हेड या पदासाठी एकच जागा रिक्त आहे.

‘गट फुटला म्हणून पवार कुटुंबात फूट नाही’; पवारांच्या बहिण सरोज पाटलांनी थेट सांगितलं 

शैक्षणिक पात्रता
कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स आणि मार्केटिंग प्रमुख पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पुढील शैक्षणिक पात्रता असावी.
सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी/ AICTE/ UGC सरकार मान्य पदवी असणे आवश्यक आहे.
कोणत्याही क्षेत्रातील व्यवस्थापन पदवी असलेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.
MBA – मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन पदवी / PGDBM – बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा / PGDM – पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

अर्ज फी
अर्ज फी – सामान्य/ईडब्ल्यूएस श्रेणीतून अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी रु.750/-.
SC/ST/OBC/PWBD प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

स्टेट बँक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट –
https://sbi.co.in/

अधिसूचना –
https://bank.sbi/documents/77530/0/ADVERTISEMENT_ADV_CRPD_SCO_2023_24_34.pdf/3b001ce8-4856-a118-7ad6-fc5354ab77e3?t=171085619067

ऑनलाइन अर्ज लिंक
https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2023-24-34/apply

वयोमर्यादा
हेड-कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि मार्केटिंग या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा ५५ वर्षे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –
इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी जॉब अर्ज भरणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 एप्रिल 2024 आहे.

अर्ज प्रक्रिया-
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि मार्केटिंग हेड या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज करताना उमेदवाराने आपली स्वाक्षरी आणि छायाचित्र अपलोड करावा. अन्यथा अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज भरताना उमेदवाराने अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडली पाहिजेत. तसेच अर्जात दिलेली माहिती पूर्ण आणि अचूक असावी. अन्यथा अर्ज नाकारल्या जाईल, याची नोंद घ्यावी.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube