35 लाखांची नोकरी नाकारली अन् पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; कोण आहे नागपूरकर IPS अधिकारी आर्चित चांडक?

IPS officer Archit Chandak हे सध्या सोशल मीडियावर चर्चेला आले आहेत. याचं कारण त्यांनी 35 लाखांची खाजगी नोकरी नकारात जनसेवा करणे पसंत केलं आहे.

IPS Officer Archit Chandak

IPS officer Archit Chandak who Turned down a ₹35 lakh job and cracked the UPSC exam very first attempt : 2018 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आर्चित चांडक हे सध्या सोशल मीडियावर चर्चेला आले आहेत. त्यांचे सध्या प्रचंड कौतुक होत आहे. याचं कारण म्हणजे आयआय’टीयन असलेल्या चाणक्यांनी तब्बल 35 लाख रुपयांच्या खाजगी नोकरीला नकारात जनसेवा करणे पसंत केला आहे.

”फडणवीसांचे मुख्यमंत्री म्हणून हे शेवटचे विधिमंडळ अधिवेशन, माझे शब्द लिहून ठेवा”

अर्चित चांडक हे सध्या महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. चांडक यांचा आयआयटी दिल्ली पासून आयपीएस अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास तरुणांना प्रेरणा देणार आहे. चांडक हे चर्चेत आले ते एका युजरने त्याच्या एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या बद्दल पोस्ट केल्यानंतर त्यांच्या 35 लाख रुपयांच्या खाजगी नोकरीला नकारात जनसेवा करण्याच्या निर्णयामुळे


परखड दिग्दर्शक मणिरत्नम यांची ‘बालन-द बॉय’ला कौतुकाची थाप; दमदार कथा आणि प्रभावी अभिनयाची प्रशंसा

चांडक यांचा जन्म आणि ते वाढलेले देखील नागपूरमध्ये आहेत. त्यांनी त्यांचं शालेय शिक्षण भवन्स बीपी विद्या मंदीर येथून पूर्ण केले आहे. 2012 मध्ये ते जेईई परिक्षेमध्ये नागपूर शहरातून पहिले आले होते. त्यानंतर त्यांनी आयआयटी दिल्लीमध्ये प्रेश मिळवला. 2016 मध्ये त्यांनी मॅकॅनिकल इंजीनिअरिंगमधून बी टेक या पदवीचे शिक्षण पूर्ण केले. याचवेळी इंटर्नशिप करत असताना त्यांना जापनिज कंपनीकडून 35 लाखांच्या नोकरीची ऑफर आली. मात्र त्यांनी ही ऑफर नाकारत जनसेवेची वाट धरली. त्यानंतर त्यांनी ठरवलं की युपीएससी परीक्षा द्यायची आणि 2018 ला पहिल्याचं प्रयत्नात त्यांनी 184 वी रँक मिळवून युपीएससी परीक्षा पास करत भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले.

पवार साहेब सांगतील ते धोरण अन् बांधतील ते…; भाजप प्रवेशाच्या चर्चांना कोल्हेंचा ठाम नकार

प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आर्चित चांडक यांनी महाराष्ट्र पोलीस दलात अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला. आपल्या सेवाकाळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर जबाबदारी सांभाळली आहे. भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (SHO) म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर नागपूरचे पोलीस उपायुक्त (DCP) म्हणून कार्यरत असताना त्यांनी आर्थिक गुन्हे शाखा (Economic Offences Wing) आणि सायबर गुन्हे शाखेची (Cyber Crime Unit) धुरा यशस्वीपणे सांभाळली. सध्या आर्चित चांडक हे अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (SP) म्हणून कार्यरत असून, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची महत्त्वाची जबाबदारी ते पार पाडत आहेत.

follow us