नोकराचं कर्ज फेडलं अन् माणुसकी दाखवली पण त्याच नोकरानं केली IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या

Delhi IRS Officers Daughter Case : दिल्लीतील IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर झालेला अत्याचार आणि हत्या प्रकरणात दररोज नवीननवीन खुलासे होत आहे.

Delhi IRS Officers Daughter Case

Delhi IRS Officers Daughter Case : दिल्लीतील IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर झालेला अत्याचार आणि हत्या प्रकरणात दररोज नवीननवीन खुलासे होत आहे. या प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घरात राहणाऱ्या नोकरानेच अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार करुन त्याची हत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. आयआरएस अधिकारी या प्रकरणातील आरोपी नोकरचे कर्ज स्वतः फेडत असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या आयआरएस अधिकाऱ्याच्या मुलीने स्वसंरक्षणासाठी आपल्या सर्व ताकदीनिशी प्रतिकार केला होता मात्र, अखेरीस त्या नोकराच्या (राहुल मीना) विकृत आणि क्रूर हल्ल्यापुढे तिला आपला जीव गमवावा लागला.

आरोपी राहुल मीना पोलीस कोठडीत

दक्षिण-पूर्व दिल्लीतील ‘अमर कॉलनी’ परिसरात बुधवार, 22 एप्रिल रोजी उघडकीस आलेल्या या खळबळजनक प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपी राहुल मीना याची रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली होती.

आरोपीला ‘ऑनलाइन बेटिंग’चे व्यसन

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल मीना हा त्या IRS अधिकाऱ्याकडे दीड वर्षांपासून घरगुती नोकर म्हणून काम करत होता. त्याच्या एका घातक सवयीमुळे त्याला अवघ्या काही दिवसांपूर्वीच कामावरून काढून टाकण्यात आले होते. तपासात असे उघड झाले की, आरोपीला ‘ऑनलाइन बेटिंग’चे व्यसन होते. या व्यसनामुळेच त्याला अनेक लोकांकडून पैसे उसने घेण्याची सवय लागली होती. त्याने राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी राहणाऱ्या लोकांकडून, तसेच दिल्लीतील त्या IRS अधिकाऱ्याच्या शेजाऱ्यांकडूनही पैसे उसने घेतले होते. त्या IRS अधिकाऱ्याने तर या शेजाऱ्यांपैकी काहींचे पैसे (कर्ज) स्वतःच्या खिशातून फेडलेही होते.

इतरांकडून पैसे उसने घेण्याच्या त्याच्या सवयीबाबत त्या अधिकाऱ्याने त्याला समजावून सांगण्याचा आणि सुधारण्याचा प्रयत्नही केला होता मात्र, आरोपीमध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. नेमक्या याच कारणामुळे त्या IRS अधिकाऱ्याने त्याला कामावरून काढून टाकले होते. अवघ्या काही महिन्यांपूर्वी जेव्हा ते IRS अधिकारी आपल्या घरकामगाराने (राहुल मीना) केलेल्या कर्जाची परतफेड करण्यात व्यस्त होते. तेव्हा त्यांना याची पुसटशीही कल्पना नव्हती की, अवघ्या काही दिवसांतच, हाच त्यांच्या कुटुंबाचा सर्वनाश करेल.

आरोपी राहुलला याची पूर्ण कल्पना होती की, मृत मुलीचे आई-वडील सकाळी व्यायामासाठी जातात. राहुल त्या इमारतीशी पूर्णपणे परिचित होता. त्याला कुलूपे नेमकी कुठे आहेत आणि ती कशी उघडायची, याची अचूक माहिती होती. सकाळी राहुल इमारतीत शिरला आणि थेट मुलीच्या अभ्यासिका कक्षाकडे गेला हा अभ्यासिका कक्ष म्हणजे फ्लॅटच्या गच्चीवर स्वतंत्रपणे उभारलेली एक खोली होती.

नमित मल्होत्रा आणि यश यांची सिनेमा-कॉन 2026 मध्ये उपस्थिती

ती मुलगी UPSC परीक्षेची तयारी करत असल्याने, तिच्या आई-वडिलांनी तिला अभ्यासासाठी पहाटे लवकर उठण्याची सूचना दिली होती. ती मुलगी अभ्यास करत असतानाच, आरोपी अचानक त्या खोलीत घुसला आणि तिचा गळा आवळून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करू लागला. त्याने तिला आपल्या कह्यात घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या मुलीने त्याला जोरदार प्रतिकार केला. त्यानंतर आरोपीने जवळच पडलेला एक जड वस्तू वापरून त्या मुलीवर हल्ला केला. या हल्ल्यामुळे तिला रक्तस्राव झाला आणि त्यानंतर ती बेशुद्ध पडली. ती मुलगी बेशुद्ध अवस्थेत असतानाच, आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर, त्याने घरातून काही मौल्यवान वस्तू गोळा केल्या आणि घटनास्थळावरून पळ काढला.

follow us