दिल्लीत सकाळी-सकाळी सीजेपीचे निदर्शने! रांका, दाससह कार्यकर्ते ताब्यात; मोदींना टॅग करत दिपके म्हणाले…
CJP protest tagging Modi, Dipke आज 13 ऑक्टोबर सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास सीजेपीच्या नेत्यांनी दिल्लीत आंदोलन केले.
CJP protest in Delhi Activists, including Ranka and Das, detained tagging Modi, Dipke said : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) आक्रमक भूमिका घेतली आहे. आज 13 ऑक्टोबर सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास सीजेपीच्या नेत्यांनी दिल्लीत आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. सौरव दास हे आपल्या काही सहकाऱ्यांसह जंतरमंतर येथे आले होते.
जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा मात्र ‘त्या’ मुद्द्यावरून ओबीसी संघटना आक्रमक होणार?
सीजेपीचे नेते आशुतोष रांका यांनी अनेक समर्थकांसह हातात झेंडे घेऊन आंदोलन केले. यावेळी ‘ज्ञानेश कुमार, राजीनामा द्या’ अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सीजेपीने ‘एक्स’ या समाजमाध्यमावर प्रसिद्ध केला आहे.
Cockroaches with the Tiranga sneaked into Jantar Mantar early this morning before they were picked up by Delhi Police.
@AshutoshRanka, @SauravDassss, @AjinkyaCJP along with other team members have been detained.
You cannot denotify the resistance, @narendramodi https://t.co/x7B40akCVO
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) October 13, 2026
दरम्यान, सीजेपीने 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीत आंदोलन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सीजेपीचे अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली विमानतळावरून पोलिसांनी ताब्यात घेतले. याशिवाय, पोलिसांनी दिल्लीतील विविध ठिकाणांहून सात हजारांहून अधिक लोकांना ताब्यात घेतले होते. मात्र, नंतर या सर्वांना सोडून देण्यात आले.