जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा मात्र ‘त्या’ मुद्द्यावरून ओबीसी संघटना आक्रमक होणार?

OBC organizations Cast census जनगणनेच्या या टप्प्यामध्ये प्रश्नावलीमुळे ओबीसी संघटना आक्रमक होण्याची शक्यता वाढली आहे.

OBC Organizations Cast Census

Announcement of second phase of census are OBC organizations aggressive stance over Cast census :देशामध्ये जनगणनेचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर आता 2027 च्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात जनगणनेच दुसरा टप्पा पार पडणार आहे. त्यासाठी जनगणना समन्वय समितीची बैठक पार पडली. मात्र या टप्प्यामध्ये नागरिकांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावलीमुळे ओबीसी संघटना आक्रमक होण्याची शक्यता वाढली आहे.

‘त्या’ मुद्द्यावरून ओबीसी संघटना आक्रमक

2027 मध्ये पार पडणाऱ्या जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण 40 प्रश्न आहेत. यामध्ये नवा बदल आहे तो म्हणजे यावेळी ओबीसींच्या मागणीमुळे पहिल्यांदाच जातींची जनगणना होणार आहे. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत केवळ अनुसूचित जाती आणि जमातींची गणना होत होती आता मात्र ओबीसींची देखील गणना होणार आहे. त्यासाठी प्रश्नावली मध्ये जाती असा रकाना तयार केला आहे.

मी एफडीएमध्येच, भेसळीविरुद्धची लढाई सुरूच! बदलीच्या चर्चांवर तुकाराम मुंढेंचं स्पष्टीकरण

मात्र यावर ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत कारण या केवल जात या रकान्यामुळे इतर जाती देखील त्यात नोंद करतील तर मग फक्त ओबींसींची आकडेवरी कशी कळणार यामुळे कवेळ संभ्रम वाढणार आहे असा आक्षेप त्यांनी घेतला आहे. त्यामुळे ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना हवा अशी मागणी या ओबीसी संघटनांनी केली आहे.

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पराभव होताच लक्ष्मीदर्शनाचा वार; मावळत्या अध्यक्षांचा विजयी पॅनेलवर वादळी आरोप

त्यात आता 2027 च्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात जनगणनेच दुसरा टप्पा पार पडणार असल्याने ओबीसी संघटनांचा पुन्हा एकदा या प्रश्नावलीला विरोध होणार आहे. अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे असे झाल्यास त्यावर सरकार नेमकं काय पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

follow us