महाराष्ट्राचे महेश दीक्षित इंटेलिजन्स ब्युरो प्रमुख! डॉक्टर ते आयपीएस अधिकारी कसा आहे प्रवास?

Maharashtra's Mahesh Dixit IB Chief यांची केंद्र सरकारने इंटेलिजन्स ब्युरो प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.

Maharashtra's Mahesh Dixit IB Chief

Maharashtra’s Mahesh Dixit IB Chief How is journey from doctor to IPS officer : केंद्र सरकारने भारतीय पोलीस सेवेतील म्हणजे आयपीएस अधिकारी महेश दीक्षित याची इंटेलिजन्स ब्युरो प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. दीक्षित हे मूळचे महाराष्ट्रातील आहेत.

विधानसभेत सायबर फसवणुकीचा मुद्दा गाजला…आमदार दातेंच्या लक्षवेधीला मुख्यमंत्री फडणवीसांचे उत्तर

सध्याचे इंटेलिजन्स ब्युरो प्रमुख तपन डेका यांचा कार्यकारळ संपल्यानंतर कार्यभार स्वीकारतील. डेका यांचा कार्यकाळ 30 जून 2026 रोजी पूर्ण होणार आहे. तर डेका हे 1988 च्या बॅचचे हिमाचल प्रदेशचे अधिकारी आहेत. त्यांची इंटेलिजन्स ब्युरो प्रमुख म्हणून 2022 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर 2 दोन वर्षा त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता.

इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे काय?

इंटेलिजन्स ब्युरो ही भारताची देशांतर्गत गुप्तचर संघटना आहे. ती अनेक प्रकरच्या विषयांवर माहिती गोळा करते. गुप्त माहितीच्या आधारे देशावरील आगामी धोक्यांना वेळीच ओळखून रोखते. ज्यामध्ये दहशतवाद, राज्यांतर्गत वाद, राजकीय नेते आणि सरकारला येणाऱ्या धमक्या त्याचबरोबर ही संघटना देशातील दुसऱ्या तपास यंत्रणा आणि पोलिसांना सहाय्यक पाठवते.

महेश दीक्षित कोण आहेत?

महेश दीक्षित हे आंध्र प्रदेश कॅडरचे 1993 च्या बॅचचे आयपीएस अधिकरी आहेत. ते सध्या आयबीचे विशेष संचालक म्हणून काम पाहत आहेत. जे या संघटनेतील दुसरं महत्त्वाचं पद आहे. जे विविध विषयांचे महत्त्वाचे ऑपरेशन्स पाहतात. तर दीक्षित हे डॉक्टर होते नंतर ते कायदा क्षेत्रामध्ये व्यावसायिक बनले. तर आता आयबीचे विशेष संचालक म्हणून त्यांच्याकडे अंतर्गत सुरक्षेसह गुप्तचर व्यापक अनुभव आहे.

follow us