”फडणवीसांचे मुख्यमंत्री म्हणून हे शेवटचे विधिमंडळ अधिवेशन, माझे शब्द लिहून ठेवा”
Aaditya Thackeray On Devendra Fadnavis : ऑपरेशन टायगरनंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप सुरु आहे.
Aaditya Thackeray On Devendra Fadnavis : ऑपरेशन टायगरनंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. एका मेळाव्यात बोलताना ऑपरेशन टायगर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ताकद कमी करण्यासाठी असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता. यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का देत आदित्य ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणारे आमदार सचिन अहिर यांना पक्षात प्रवेश देत विधानपरिषदेच्या उपसभापती म्हणून संधी दिली. यावर बोलताना आमदार आदित्य ठाकरे यांनी आता मोठा दावा केल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना कमकुवत करण्याचा हा डाव असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी इंडिया टिव्हीशी बोलताना केला आहे.
यावेळी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे केंद्रातील भाजपाच्या (BJP) ज्येष्ठ नेत्यांच्या इशाऱ्यावर काम करत असून फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या राष्ट्रीय राजकारणातील स्थानाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. राष्ट्रीय आणि राज्याच्या राजकारणात सध्या ज्या घडामोडी घडत आहे त्यात शिवसेनेचा नाहक बळी जातोय. राज्यात ज्या ताज्या घडामोडी घडल्या त्या देखील ऑपरेशन फडणवीसचा भाग आहे. ज्यांना ज्यांना राष्ट्रीय राजकारणात संभाव्य दावेदार समजले जात होते त्यांना एक एक करुन बाजूला काढण्यात येत आहे. एकनाथ शिंदे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या इशाऱ्यावर काम करत आहे. ज्यामुळे फडणवीस हे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत राहणार नाही असा प्रयत्न करण्यात येत आहे असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले.
पवार साहेब सांगतील ते धोरण अन् बांधतील ते…; भाजप प्रवेशाच्या चर्चांना कोल्हेंचा ठाम नकार
मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचे हे शेवटचे अधिवेशन
पुढे बोलताना आदित्य ठाकरे यांनी मोठा दावा करत हे अधिवेशन देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्री म्हणून शेवटचे अधिवेशन असणार असं म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही दिवसांतच केंद्रीय मंत्रिमंडळात दिसणार आहे. फडणवीस यांचे हे मुख्यमंत्री म्हणून शेवटचे अधिवेशन असणार, हे माझे शब्द लिहून ठेवा. एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी प्रयत्न करतील असेही आदित्य ठाकरे म्हणाले.