वाकड-ताथवडेमध्ये लाखो लिटर पाण्याच्या टाक्या पण पाणीच नाही, फडणवीसच प्रकल्पाला न्याय देणार कलाटेंना विश्वास

Wakad-Tathawade . भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवक राहुल कलाटे यांनी याबाबत बोलताना भावना व्यक्त केल्या आहेत.

Rahul Kalate

Wakad-Tathawade has water tanks but no water Kalate confident Fadnavis will do justice to Project : पिंपरी चिंचवडचे वाढते नागरीकरण लक्षात घेता पवना बंद जलवाहिनी प्रकल्प पूर्ण करणे अनिवार्य आहे. गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ राजकीय अनास्थेमुळे रखडलेला हा प्रकल्प आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांच्या पुढाकाराने पुन्हा प्राधान्यक्रमावर आला आहे. त्यासाठीची महत्वाची बैठक ३ जुलै रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडते आहे. यासाठी देवाभाऊंचे धन्यवाद. मावळच्या शेतकऱ्यांना न्याय देत पिंपरी चिंचवडच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी देवाभाऊ या बैठकीत सकारात्मक निर्णय घेतील, याबद्दल खात्री आहे. भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवक राहुल कलाटे यांनी याबाबत बोलताना भावना व्यक्त केल्या आहेत. पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात प्रत्यक्ष भेट घेऊन आभार मानल्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला.

Zomato-Swiggy ला AI मुळे घरघर पण, करोडो भारतीयांची सवय तारून नेणार : BofA

राहुल कलाटे म्हणाले की, “माझ्या प्रभागातील वाकड ताथवडे आणि पुनावळेत ४५ लाख आणि २५ लाख लिटर क्षमेतच्या उंच पाण्याच्या टाक्या बांधून पूर्ण आहेत मात्र पाण्याअभावी कार्यान्वित करता येत नाहीत. त्यामुळे पवना बंद जलवाहिनी प्रकल्प तातडीने पूर्ण करणे हीच आपली सर्वोच्च प्राथमिकता राहणार असून, त्यासाठी महापालिका सभागृहात मी सातत्याने आग्रही मांडणी केलेली आहे. सातत्याने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत. या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ जुलै रोजी मुंबई येथे, अधिवेशनादरम्यान, महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत सकारात्मक निर्णय होईल, असा ठाम विश्वास राहुल कलाटे यांनी व्यक्त केला.

‘मोआना’मधील नृत्य सर्वात मोठं आव्हान होतं; ड्वेन जॉन्सनने शेअर केला अनुभव

ते पुढे म्हणाले की, जवळपास १५ वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे बरेचसे अधिग्रहण पूर्ण झाले आहे. शिवाय माहापालिकेनेही प्रकल्पाच्या निधीसाठी आवश्यक पुढाकार घेतलेला आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सर्व रास्त मागण्या मान्य करण्याची भूमिका पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि राज्य सरकारने घेतली आहे. त्यामुळे उर्वरित अडथळे दूर करून हा महत्त्वाचा प्रकल्प पूर्ण होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, ३ जुलैच्या बैठकीत यावर नक्कीच सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.राहुल कलाटे यांनी शहराच्या दीर्घकालीन पाणी सुरक्षेसाठी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाला सर्वोच्च प्राधान्य देण्याची मागणी करत, हा प्रकल्प पूर्ण झाल्यास भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटेल, असा विश्वास व्यक्त केला.

होम्बळे फिल्म्सची मोठी घोषणा! ‘द वन’ सूर्या आणि ‘जय भीम’चे दिग्दर्शक टी. जे. ज्ञानवेल नवी सिनेमासाठी एकत्र

यावर बोलताना नगरसेवक राहुल कलाटे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणी सुरक्षेसाठी पवना धरण बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाला पर्याय नाही. माझ्या प्रभागातील वाकड, ताथवडे आणि पुनावळेत ४५ लाख आणि २५ लाख लिटर क्षमेतच्या उंच पाण्याच्या टाक्या बांधून पूर्ण आहेत मात्र पाण्याअभावी कार्यान्वित करता येत नाहीयेत. त्यामुळे पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प तातडीने पूर्ण करणे हीच आपली सर्वोच्च प्राथमिकता राहणार असून त्यासाठी सातत्याने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करत राहू. आता कोणताही विलंब न करता हा प्रकल्प पूर्ण करून पिंपरी-चिंचवडकरांना कायमस्वरूपी पाणी सुरक्षा मिळवून देणे ही काळाची गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकल्पाला न्याय देतील, याबाबत आम्हाला विश्वास आहे.

follow us