आता ‘ॲडव्हान्स टिप’ चा खेळ संपला; Ola, Uber आणि Rapido राइड बुकसाठी नवीन नियम जाणून घ्या

Rapido Booking : जर तुम्ही देखील Ola, Uber आणि Rapido सारख्या ॲप्सवर राईड बुक करत असाल तर तुमच्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा

Rapido Booking

Rapido Booking : जर तुम्ही देखील Ola, Uber आणि Rapido सारख्या ॲप्सवर राईड बुक करत असाल तर तुमच्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने ॲप-आधारित ड्रायव्हर्सची मनमानी वृत्ती बंद करण्यासाठी निर्देश दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून अ‍ॅडव्हान्स टीप न दिल्याने अनेक राईड रद्द होण्याच्या घटनेत मोठी वाढ झाल्याने ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. यावर आता सरकारने निर्देश देत या ॲप्सना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून अ‍ॅडव्हान्स टीपचा पर्याय त्वरित काढून टाकण्याचे निर्देश देणारे परिपत्रक जारी केले.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या ॲप-आधारित कॅब कंपन्या ‘ग्राहक संरक्षण कायदा, 2019 ‘ चे उल्लंघन करत आहेत. नवीन नियमांनुसार, टीप देणे ही ग्राहकांची पसंती किंवा मर्जीची बाब आहे, सक्तीची नाही. अशा मनमानी पद्धतींना आळा घालण्यासाठी सरकारने या कंपन्यांवर प्रभावीपणे नियंत्रण आणले आहे. कंपन्यांना आता अ‍ॅडव्हान्स टीप मागता येणार नाही.

सरकारच्या या अधिसूचनेमुळे Ola, Uber आणि Rapido सारख्या ॲप-आधारित कॅब बुकिंग कंपन्यांना आता राईड देण्यासाठी अ‍ॅडव्हान्स टीप गोळा करता येणार नाही. बुकिंगच्या वेळी ॲपमध्ये असा कोणताही पर्याय दिसणार नाही. ‘मोटर वाहन ॲग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वां’मधील नियम 14.15 मध्ये असेही नमूद केले आहे की, टीपचा पर्याय सेवा पूर्ण झाल्यानंतरच दिसला पाहिजे.

सरकारच्या या निर्णयाचा सर्वाधिक फायदा प्रवाशांना होणार आहे. टीप देणे ही पूर्णपणे ऐच्छिक बाब आहे ती अनिवार्य अट मानली जाऊ शकत नाही. या ॲप्सवरील ‘ॲडव्हान्स टिप’ सुविधेमुळे, केवळ राईड बुक करण्यासाठी ग्राहकांना अनेकदा टीप देणे भाग पडत असे.

… तोपर्यंत पंतप्रधान मोदींना रात्रीची झोप लागू देणार नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल –

‘ॲडव्हान्स टिप’ सुविधेचा कंपन्यांनाही फायदा होत होता. चालकांना टीपची पूर्ण रक्कम मिळत नसे कारण कंपन्या त्यातून स्वतःचे कमिशन काढून घेत असत. अधिक कमाईच्या आशेने चालक अनेकदा जास्त टीप देणाऱ्या ग्राहकांना प्राधान्य देतात, परंतु ही पद्धत आता बंद होईल. राईड पूर्ण झाल्यानंतर ग्राहक आपल्या मर्जीनुसार टीप देऊ शकतील.

follow us