‘मोआना’मधील नृत्य सर्वात मोठं आव्हान होतं; ड्वेन जॉन्सनने शेअर केला अनुभव
Moana या चित्रपटातून अभिनेता ड्वेन जॉन्सन पुन्हा एकदा ‘माउई’ या लोकप्रिय पात्राच्या भूमिकेत दिसणार आहे.
Dance in ‘Moana’ was biggest challenge; Dwayne Johnson shares his experience : डीस्नेचा बहुप्रतीक्षित लाइव्ह-अॅक्शन चित्रपट ‘मोआना’ 10 जुलै 2026 रोजी भारतात इंग्रजी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून अभिनेता ड्वेन जॉन्सन पुन्हा एकदा ‘माउई’ या लोकप्रिय पात्राच्या भूमिकेत दिसणार आहे. अॅनिमेटेड चित्रपटात आवाज दिल्यानंतर आता तोच करिष्माई डेमीगॉड तो प्रत्यक्ष पडद्यावर साकारत आहे.
या चित्रपटातील आणखी एक खास आकर्षण म्हणजे ‘You’re Welcome’ हे लोकप्रिय गाणे. अॅनिमेटेड आवृत्तीत हे गाणे ड्वेन जॉन्सन यांनी गायले होते. मात्र, यावेळी प्रथमच ते हे गाणे पडद्यावर गातानाच त्यावर नृत्यही करताना दिसणार आहेत.अलीकडील एका मुलाखतीत त्यांना अॅक्शन आणि डान्स कोरिओग्राफी यापैकी अधिक कठीण काय वाटले, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना जॉन्सन यांनी नृत्य अधिक आव्हानात्मक असल्याचे सांगितले.
ते म्हणाले, “नृत्य करताना संगीताच्या तालाशी अचूक जुळवून घ्यावे लागते. गाण्याचे शब्द, त्यातील भावना आणि प्रत्येक स्टेप यांचा अचूक मेळ साधावा लागतो. त्यात जोडीदारासोबत समन्वय राखणेदेखील तितकेच महत्त्वाचे असते. ‘You’re Welcome’ या गाण्यात माझ्यासोबत कॅथरीन आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेक गोष्टींचा समतोल राखावा लागला आणि ते खूप आव्हानात्मक ठरले.”
अत्याचाराच्या घटनांना केवळ सरकार जबाबदार नाही; भाजपच्या महिला आमदाराचं अजब विधान…
ड्वेन जॉन्सन यांनी सांगितले की, अनेक वर्षे अॅक्शनपटांमध्ये काम केल्यामुळे अॅक्शन दृश्ये सादर करण्याचा अनुभव त्यांना आहे. मात्र, जगभरातील प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान असलेल्या गाण्यावर नृत्य करणे ही वेगळीच जबाबदारी होती. “या गाण्यावर प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे लाइव्ह-अॅक्शन आवृत्तीत तेच भावविश्व जपत काहीतरी नवीन सादर करण्याचा प्रयत्न आम्ही केला. त्यामुळे प्रत्येक क्षणी जबाबदारीची जाणीव आणि तितकाच दबावही जाणवत होता,” असे त्यांनी सांगितले.
अत्याचाराच्या घटनांना केवळ सरकार जबाबदार नाही; भाजपच्या महिला आमदाराचं अजब विधान…
एमी आणि टोनी पुरस्कार विजेते दिग्दर्शक थॉमस कैल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ड्वेन जॉन्सन, डॅनी गार्सिया, ब्यू फ्लिन, हिराम गार्सिया आणि लिन-मॅन्युएल मिरांडा हे चित्रपटाचे निर्माते आहेत. अॅनिमेटेड ‘मोआना’ आणि ‘मोआना 2’मध्ये मुख्य पात्राला आवाज देणारी ऑली क्रावाल्हो या चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्यांमध्ये सहभागी आहे.
लिन-मॅन्युएल मिरांडा, ओपेटाया फोआई आणि मार्क मॅन्सिना यांनी चित्रपटातील गाण्यांना संगीत दिले असून, पार्श्वसंगीतही मार्क मॅन्सिना यांनीच तयार केले आहे. साहस, संगीत आणि नेत्रदीपक दृश्यांचा संगम असलेला ‘मोआना’ हा चित्रपट 10 जुलै 2026 पासून भारतभरातील चित्रपटगृहांमध्ये इंग्रजी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.