‘तुम ही आना’च्या सुपरहिट टीमचं पुनरागमन; ‘तेरा यार हूँ मैं’मधील ‘तुम ही से प्यार’ 1 जुलैला प्रदर्शित होणार
Tera Yaar Hoon Main या चित्रपटातील दुसरे गाणे ‘तुम ही से प्यार’ 1 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
superhit team ‘Tum Hi Aana’ reunites ‘Tum Hi Se Pyaar’ from ‘Tera Yaar Hoon Main’ to released : ‘तुम ही आना’ या गाण्याच्या अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा तीच यशस्वी टीम एकत्र आली आहे. दिग्दर्शक मिलाप मिलन झवेरी यांच्या आगामी ‘तेरा यार हूँ मैं’ या चित्रपटातील दुसरे गाणे ‘तुम ही से प्यार’ 1 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने आता या नव्या गाण्याबाबतही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
अत्याचाराच्या घटनांना केवळ सरकार जबाबदार नाही; भाजपच्या महिला आमदाराचं अजब विधान…
‘तुम ही से प्यार’साठी गायक जुबिन नौटियाल, संगीतकार पायल देव, संगीत संयोजक आदित्य देव, गीतकार कुणाल वर्मा आणि दिग्दर्शक मिलाप मिलन झवेरी हे पुन्हा एकत्र आले आहेत. ‘तुम ही आना’नंतर या टीमचे हे आणखी एक महत्त्वाचे सहकार्य ठरत आहे.
याबाबत बोलताना मिलाप मिलन झवेरी म्हणाले, “माझ्या प्रत्येक चित्रपटात संगीताला विशेष स्थान असते आणि ‘तुम ही से प्यार’ही त्याला अपवाद नाही. ‘तुम ही आना’ला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमानंतर या संपूर्ण टीमसोबत पुन्हा काम करण्याचा अनुभव खूप खास आहे. हे गाणे स्वतःची वेगळी भावना आणि कथा घेऊन येत असून ‘तेरा यार हूँ मैं’च्या भावविश्वाला अधिक समृद्ध करणारे आहे. 1 जुलैला प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.”
विधानपरिषद उपसभापतीपदाची निवडणूक जाहीर,1 जुलैला होणार मतदान
या चित्रपटातून अमन इंद्र कुमार अभिनय क्षेत्रात पदार्पण करत असून त्याच्या समोर आकांक्षा शर्मा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या नव्या जोडीची झलक या गाण्यात पाहायला मिळणार आहे. चित्रपटात परेश रावल, जॉनी लिव्हर, सुप्रिया पिळगावकर, मृणाल कुलकर्णी, नेहा खान, पूजा कातुर्डे, आनंद आचार्य आणि दर्शन जरीवाला यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर… एनटी रामारावांचा ‘तो’ प्रसंग अन् ठाकरेंचा फडणवीसांना पाठिंबा
‘तेरा यार हूँ मैं’मधील सर्व गाणी झी म्युझिकच्या यूट्यूब चॅनेलसह विविध म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहेत. अजय मुर्डिया यांच्या प्रस्तुतीखाली मुंबई फिल्म्स, बीआयके प्रॉडक्शन्स आणि एंटर10 टेलिव्हिजन यांच्या सहकार्याने चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. अजय मुर्डिया, बीना इंद्र कुमार आणि मनीष सिंघल हे चित्रपटाचे निर्माते असून सुभाष काळे सहनिर्माते आहेत. ‘तेरा यार हूँ मैं’ हा चित्रपट 24 जुलै 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.