विधानपरिषद उपसभापतीपदाची निवडणूक जाहीर,1 जुलैला होणार मतदान

Legislative Council Deputy Chairman राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना एक मोठी बातमी समोर आली आहे.

Legislative Council Deputy Chairman

Election for Legislative Council Deputy Chairman announced voting to held on July 1 : राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. विधानपरिषद उपसभापतीपदाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यासाठी 30 जून दुपारी 12 वाजपर्यंत अर्ज दाखल करता येणार तर 1 जुलैला मतदार पार पडणार आहे.

अत्याचाराच्या घटनांना केवळ सरकार जबाबदार नाही; भाजपच्या महिला आमदाराचं अजब विधान…

दरम्यान विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महायुतीत हालचालींना वेग आला आहे. माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे नाव प्रमुख दावेदार म्हणून चर्चेत असले, तरी अंतिम क्षणी वेगळा निर्णय होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून नेमका कोणता चेहरा पुढे येणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

“‘मैं वापस आऊंगा’ अन् ‘ऐल्फा’ ने एका महिन्यात प्रेक्षकांची मनं जिंकली, तर माझं स्वप्न पूर्ण; शर्वरीने व्यक्त केली मनिषा

निवडणूक कार्यक्रमानुसार, 30 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर दुपारी 1 वाजता अर्जांची छाननी होईल. माघारीची वेळ संपल्यानंतर आवश्यक असल्यास 1 जुलै रोजी मतदान घेतले जाईल. मात्र एकच उमेदवार मैदानात राहिल्यास निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

विधानपरिषद उपसभापतीपदाची निवडणूक जाहीर,1 जुलैला होणार मतदान

विधान परिषदेत भाजपचे संख्याबळ सर्वाधिक असले तरी महायुतीतील सत्तासमीकरणानुसार उपसभापतीपद शिवसेनेच्या (शिंदे गट) वाट्याला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या पदासाठी शिंदे गटातील अनेक इच्छुकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. नीलम गोऱ्हे यांच्यासोबतच कृपाल तुमाने, चंद्रकांत रघुवंशी आणि मनीषा कायंदे यांच्या नावांचीही चर्चा सुरू आहे. पक्षश्रेष्ठी कोणावर विश्वास दाखवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर… एनटी रामारावांचा ‘तो’ प्रसंग अन् ठाकरेंचा फडणवीसांना पाठिंबा

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतिम क्षणी वेगळा उमेदवार देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का देऊ शकतात, अशीही राजकीय चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने विरोधी पक्ष उमेदवार देणार की निवडणूक बिनविरोध होणार, हे नामनिर्देशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होईल. त्यामुळे 30 जून रोजी दाखल होणारे अर्ज आणि 1 जुलैचा निकाल राज्याच्या राजकारणासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

follow us