Download App

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी बंपर भरती, कोण करू शकतं अर्ज?

नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भरतीची एक अधिसूचना जारी केली आहे. या भरती मोहिमेद्वारे 94 पदे भरण्यात येणार आहेत.

  • Written By: Last Updated:

RBI Recruitment 2024 : दिवसेंदिवस बॅंकींग (Bank Job) क्षेत्रात नोकरीच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. तुम्ही देखील बॅंकींग क्षेत्रातील नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) भरतीची एक अधिसूचना जारी केली आहे. या भरती मोहिमेद्वारे 94 पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे. दरम्यान, या भरतीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता काय? अर्ज कसा करायचा? अर्ज करण्याची शेवटची तारीख किती? याच विषयी जाणून घेऊ.

Video: अर्थसंकल्पाचा हलवा पिछड्या वर्गाला पाहायलाही मिळाला नाही; लोकसभेत राहुल गांधींचा घणाघात 

एकूण पदे – 94 पदे

रिक्त पदे –
या भरती अंतर्गत, अधिकारी (ऑफिसर) पदांच्या 94 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही विषयातील पदवी 60 % गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. तर SC/ST/PWBD अर्जदारांनी 50% गुणासह पदवी उत्तीर्ण केलेली असावी.

Shruti Marathe: मराठमोळ्या श्रुती मराठेचं निळ्या साडीत सुंदर फोटोशूट 

अर्ज शुल्क –
भरतीसाठी सहभागा होणाऱ्या उमेदवारांना ठराविक रक्कम प्रवेश शुल्क म्हणून भरावी लागणार आहे.
SC/ST/PWBD उमेदवारांसाठी अर्जाची फी रु 100 प्लस 18% GST आहे. तर OBC, EWS उमेदवारांसाठी 850 रुपये प्लस 18% GST इतकी फी आहे.
उमेदवार डेबिट कार्ड, रुपे, व्हिसा, मास्टरकार्ड, मेस्ट्रो, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, IMPS, कॅश कार्ड, मोबाइल वॉलेट, UPI वापरून पेमेंट करू शकतात.

अधिकृत वेबसाइट – rbi.org.in

निवड प्रक्रिया –
1. निवड प्रक्रियेमध्ये पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि मुलाखत यांचा समावेश असेल. पहिल्या टप्प्यातील परीक्षेत 200 गुणांसाठी एकच पेपर असेल आणि ती 8 सप्टेंबर 2024 रोजी घेतली जाईल. उमेदवारांच्या संख्येनुसार परीक्षा अनेक शिफ्टमध्ये आणि काही इतर दिवशीही घेतली जाऊ शकते.

2. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा ऑनलाइन परीक्षा 19 ऑक्टोबर 2024 रोजी फक्त पहिल्या टप्प्याच्या निकालाच्या आधारे निवडलेल्या उमेदवारांसाठीच घेतली जाईल.

3. त्यानंतर (पेपर-I + पेपर-II + पेपर-III) मध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे, उमेदवारांना मुलाखतीसाठी निवडले जाईल.

अंतिम तारीख : 16 ऑगस्ट 2024

अधिसूचना – https://rbidocs.rbi.org.in/rdocs/Content/PDFs/ADVTGRBDRGENERALDEPRDSIMPY202414FE01A03453453BAD9BFF7EDD198B90.PDF

follow us