उपमुख्यमंत्री इथे नसतानाही पूर आला; पुण्याच्या पुरावरून राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला

उपमुख्यमंत्री इथे नसतानाही पूर आला; पुण्याच्या पुरावरून राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला

Raj Thackeray on Ajit Pawar due to Pune flood : पुण्यामधील पुरस्थितीला (Pune flood ) सरकार जबाबदार आहे. राज्याला दोन उपमुख्यमंत्री आहेत. एक तर पुण्यातीलच आहे. ते या ठिकाणी नसतानाही धरणात पूर आला. त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला नको का? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या एका जुन्या विधानावरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ठाकरे हे पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

तब्बल ९ पतसंस्थांत ६७० कोटी रुपयांचे घोटाळे, छत्रपती संभाजीनगरातील एक लाख ठेवीदार भरडले

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, पुण्यात पुरस्थिती निर्माण झाली कारण नदीत अनधिकृत बांधकाम झाले आहे. त्यामुळे ही घटना घडली सरकारने यासाठी मदत करणे गरजेचे आहे. वाऱ्यावर सोडून चालणार नाही. सरकारकडे टाऊन प्लॅनिंग नाही. त्यात अचानक जास्त पाणी सोडले, घरात पाणी शिरले. पुणेच काय कोणत्याही शहरात टाऊन प्लॅनिंग चालवलं जातं नाही. दिसल जमीन की विक असच चालू आहे. एक पुणे नाही तर पुण्यात पाच पाच शहर झाली आहे. कमी काळात या शहराचा विस्तार झालाय. हे विचित्र आहे, अद्भुत आहे.

पंतप्रधान कार्यालय ते पुणे पोलीस… सगळ्यांना कामाला लावून IAS पूजा खेडकर गेल्या तरी कुठे?

दुसरीकडे केंद्र सरकार, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेत नाही. नगरसेवक नाही त्यामुळे जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. इथ बाहेरून येणाऱ्यांना फुकट घर दिली जात आहे आणि इथल्या लोकांना बेघर केलं जातं आहे. याला सरकार चालवणे म्हणतात का? ही सगळी जबाबदारी प्रशासनाची आहे. आपल्या राज्याचा कुणी विचार केला जाणार आहे का नाही.

Paris Olympics : मेडल मिळण्याआधीच खेळाडूंची चांदी! सॅमसंगनं दिलं मोठं गिफ्ट

त्याचबरोबर ही देखील लाजिरवाणी गोष्ट आहे की, पुण्यासारख्या शहरात साफसफाईला पनवेल आणि ठाण्यामधून लोक मागवावे लागतात. यात माजी नगरसेवकांनी नीट जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. राज्य सरकारलां, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याना स्वतः लक्ष घालावं लागणार आहे. फक्त अधिकाऱ्यांच निलंबन होऊन प्रश्न सुटणार नाही.

या राज्याला दोन उपमुख्यमंत्री आहेत. एक तर पुण्यातीलच आहे. ते या ठिकाणी नसतानाही धरणात पूर आला. त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला नको का? त्यामुळे आपापसातले हेवेदावे बाजूला ठेवून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र बसले तर हा प्रश्न सुटेल. हे एकट्या पक्षाच काम नाही. असं म्हणत राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या एका जुन्या विधानावरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube