मोठी बातमी! पूर परिस्थिती हाताळण्यात अपयश; पुणे मनपाचे सहाय्यक आयुक्त निलंबित

मोठी बातमी! पूर परिस्थिती हाताळण्यात अपयश; पुणे मनपाचे सहाय्यक आयुक्त निलंबित

Pune News : पुणे शहरात मुसळधार पावसाने अक्षरशः दाणादाण (Pune Heavy Rain) उडाली. शहरातील रस्ते पाण्याखाली गेले. लोकांच्या घरात पाणी शिरले. शहरालाच पाण्याचा विळखा पडला होता. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसानंतर शहराची (Pune Rains) दैना उडाली. आता पावसाने उघडीप दिली असून प्रशासनाने आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत. विरोधकांनी प्रशासनच्या कारभारावर टीकेची झोड उठवली होती. महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. यानंतर आता महापालिका प्रशासन अॅक्टिव्ह मोडमध्ये आले आहे. पुण्यातील पूर परिस्थितीत कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी महापालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांना निलंबित करण्यात आले आहे. मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी ही कारवाई केली आहे.

पुणे, नाशिकच्या पावसाचा नगरलाही धोका! नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा  

पुण्यात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे सिंहगड रस्ता भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या पूर परिस्थितीमुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते. पूर परिस्थिती निर्माण झाली तेव्हा पालकमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली होती. नागरिकांचे हाल होण्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करा असे आदेश देखील दिले होते. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कारवाईचे आदेश दिले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या (Devendra Fadnavis) आदेशानंतर आता महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले ॲक्शन मोडवर आले आहेत. या पूर परिस्थितीमध्ये कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पहिली कारवाई सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांच्यावर करण्यात आली आहे. कामाच्या जबाबदारीत कसूर कर्तव्य पार पाडताना गुणवत्ता औचित्य आणि उत्तरदायित्व ठेवले नसल्याचा ठेवला ठपका खलाटे यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, बुधवारी धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने खडकवासला धरणाच्या सांडव्यातून पुण्यात मुठा नदी पात्रामध्ये ४० हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आलं होतं. त्यामुळे मुठा नदीला पूर येऊन डेक्कन, सिंहगड रोड, एकता नगर, पुलाची वाडी या भागात पाणी शिरलं. अचानक पाणी वाढल्याने नागरिक घरातच अडकून पडले. अनेक घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाले. दरम्यान, पुणे शहरासह लगतच्या गावांनाही फटका बसला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या होत्या.

पूरस्थितीला भाजपचा भ्रष्ट अन् नियोजनशून्य कारभार जबाबदार.. माजी आमदार मोहन जोशींची टीका

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube