पूरस्थितीला भाजपचा भ्रष्ट अन् नियोजनशून्य कारभार जबाबदार…; माजी आमदार मोहन जोशींची टीका

पूरस्थितीला भाजपचा भ्रष्ट अन् नियोजनशून्य कारभार जबाबदार…; माजी आमदार मोहन जोशींची टीका

पुणे : गेल्या दोन दिवसांत पडलेल्या पावसामुळे शहरात नागरी सुविधांचा बट्ट्याबोळ उडाला. चार जण दगावले. अनेक मध्यमवर्गीयांच्या मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. या संपूर्ण परिस्थितीला गेले सात वर्ष चाललेला भाजपच (BJP) भ्रष्ट आणि नियोजनशून्य कारभार जबाबदार आहे, असा आरोप माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी केला.

सुधा मूर्तींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर, 1 ऑगस्टला होणार महाराष्ट्र सदनात गौरव… 

पालकमंत्री अजितदादा की मोहोळ?

या पूरस्थितीला सामोरे जातांना केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या. बिकट प्रसंगातही दोन मंत्र्यांमध्ये समन्वय नसल्याचे या बैठकांमधून दिसून आले. आपापल्या पक्षाला श्रेय घेण्यासाठी पूरग्रस्त पुणेकर नागरिकांना वेठीस धरण्याचे काम केले. त्यामुळे पुणेकरांपुढे प्रश्न निर्माण झाला की, पालकमंत्री कोण? अजितदादा की मोहोळ?, असा सवाल जोशींनी केला.

काय केलं साहेबांनी? अमित शाहानंतर नरेंद्र मोदींवर शरद पवारांचा हल्लाबो

पुढं ते म्हणाले, खडकवासला धरणातून नदीत पाणी सोडण्यात आले, यासंदर्भात नागरिकांना पूर्वसूचना देण्यात आल्या नाहीत, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. याबाबतही दोन मंत्र्यांची विधाने विसंगत आहेत. पाणी नेमके किती? आणि किती वाजता सोडले? याची उत्तरे पुणेकरांना मिळाली नाहीत, असं जोशींनी म्हटलं.

भाजपच्या लोकप्रतिनिधींनी निराशाच केली
भारतीय जनता पक्षाने पुणेकरांना स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवले. पण सिटी स्मार्ट होणे राहू दे, ती बकालच झाली. 2017 पासून 5 वर्षे महापालिकेत भाजपची सत्ता होती. 2014 पासून 19 पर्यंत आणि गेली दोन वर्षे राज्यात भाजपचे सरकार आहे. या सरकारांनी पुण्यासाठी ठोस मदत केली नाही. याउलट महापालिकेच्या अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी आहेत. भाजपचे लोकप्रतिनिधी टेंडरमध्येच रमल्याचे सर्रास बोलले जात होते. भाजपचे खासदार आणि आमदार पुणेकरांनी निवडून दिले. पण, भाजपच्या लोकप्रतिनिधींनी निराशाच केली, अशा शब्दात जोशींनी टीका केली.

मुळा-मुठा नदी सुधार योजनेचा बराच गवगवा झाला. मात्र त्या दृष्टीने काम तूसभरही झालेले नाही. शहरात साठणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रभावी ड्रेनेज व्यवस्था नाही. नदीकाठी पूररेषा आखून नियोज करण्याबाबतही हलगर्जीपणा दाखवला. महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये औषधांचा तुटवडा, अशी परवड पुणेकरांची झालेली आहे.

पुण्यातील जनतेने गेल्या दहा वर्षांत प्रत्येक निवडणुकीत भाजपला मतदान केले आहे. त्या बदल्यात आपल्याला काय मिळाले? याचा विचार आता पुणेकरांनी करण्याची गरज आहे, असंही जोशी म्हणाले.

तसेच पुसस्थितीत अग्निशमन दल, पोलीस, महावितरण, राज्य सरकार आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी पूरपरिस्थितीत मदतकार्य केले. त्याबद्दल काँग्रेस पक्षाच्यावतीने त्यांनी आभारही मानले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube