सुधा मूर्तींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर, 1 ऑगस्टला होणार महाराष्ट्र सदनात गौरव…

सुधा मूर्तींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर, 1 ऑगस्टला होणार महाराष्ट्र सदनात गौरव…

Sudha Murthy : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि राज्यसभा सदस्य सुधा मूर्ती (Sudha Murthy) यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार (Lokmanya Tilak National Award) जाहीर झाला आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक (Dr. Rohit Tilak) यांनी आज पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली. स्मृतिचिन्ह आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लोकमान्य टिळक मेमोरियल ट्रस्टच्या (टिळक स्वराज्य संघ) वतीने हा पुरस्कार दिला जातो.

‘TMKOC’ मालिकेतून आणखी एका कलाकाराची एक्झिट, 16 वर्षांनंतर सोडला शो 

सुधा मुर्ती यांनी ग्रामीण भागातील विकासाबरोबरच साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. लोकमान्यांच्या चतु:सूत्रीतील स्वदेशीच्या अनुषंगाने त्यांनी मानवी आणि सामाजिक विकासासाठी महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या भरीव आणि अतुलनीय अतुलनीय कार्याची दखल घेऊनच टिळक स्माकर ट्रस्टच्या विश्वस्तांनी सुधा मूर्ती यांची यावर्षीच्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे.

काय केलं साहेबांनी? अमित शाहानंतर नरेंद्र मोदींवर शरद पवारांचा हल्लाबोल

1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी दिवशी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात सायंकाळी 6 वाजता सुधा मूर्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते व शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार शाहू छत्रपती महाराज, केरळचे माजी गृहमंत्री रमेश चेन्निथला हे प्रमुख असणार आहेत.

याशिवाय, डॉ. गीताली टिळक, डॉ. प्रणती रोहित टिळक यासंह ट्रस्टचे अन्य विश्वस्त यावेळी उपस्थित असतील. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे यंदा 42 वे वर्ष आहे.

याच कार्यक्रमात टिळक स्माकर ट्रस्टचे विश्वस्त डॉ. प्रणती रोहित टिळक लिखित ‘लिजंडरी लोकमान्य’ या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. या कॉफीटेबल बुकमध्ये लोकमान्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना आणि दुर्मिळ छायाचित्रे आहेत.

दरम्यान, 1983 पासून देशहितासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आतापर्यंत एस.एम.जोशी, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी, शंकर दयाळ शर्मा, बाळासाहेब देवरस, खान अब्दुल गफार खान, शरदचंद्र पवार, एन. आर. नारायणमूर्ती, जी. माधवन नायर, डॉ. कोटा हरिनारायण, राहुल बजाज, बाबा कल्याणी, ई. श्रीधरन, प्रा. मे. स्वामिनाथन, डॉ. वर्गीस कुरियन आदींना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube