महिला दिनी सुधा मूर्ती यांचा सन्मान : राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नियुक्ती

Sudha Murty

नवी दिल्ली : इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी, इन्फोसिस फाउंडेशनच्या माजी अध्यक्षा आणि ज्येष्ठ लेखिका सुधा मूर्ती (Sudha Murthy) यांची राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आज (8 मार्च) आंतरराष्ट्रीय महिला दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मूर्ती यांच्या नियुक्तीविषयी घोषणा केली. (Sudha Murthy nominated to Rajya Sabha, PM announces on Women’s Day)

सुधा मूर्ती यांच्या नियुक्तीविषयी माहिती देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती केल्याने मला आनंद होत आहे. सामाजिक कार्य, परोपकार आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रात सुधाजींचे योगदान प्रचंड आणि प्रेरणादायी आहे. राज्यसभेतील त्यांची उपस्थिती ही आमच्या ‘नारी शक्ती’चा एक मोठा पुरावा आहे, भारताचे भविष्य घडवण्यात महिलांनी किती योगदान दिले आहे, याचे हे उदाहरण ठरेल. त्यांच्या फलदायी फलदायी संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छा… असेही मोदी म्हणाले.

बातमी अपडेट होत आहे…

follow us