अभियंता, लेखन ते सामाज कार्य Sudha Murthy यांच्याबद्दल या खास गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

अभियंता, लेखन ते सामाज कार्य Sudha Murthy यांच्याबद्दल या खास गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

Sudha Murthy : इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी, इन्फोसिस फाउंडेशनच्या माजी अध्यक्षा आणि ज्येष्ठ लेखिका सुधा मूर्ती (Sudha Murthy) यांचा आज महिला दिनी सन्मान करण्यात आला आहे. मूर्ती यांची राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र उद्योग, लेखन ते सामाज कार्य यासह सुधा मूर्ती यांच्याबद्दलच्या आणखीही काही खास गोष्टी आजच्या महिला दिनानिमित्त जाणून घेऊ…

Krishna Shroff: जागतिक महिला दिनानिमित्त कृष्णा श्रॉफची खास पोस्ट, म्हणाली…

सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस्ट 1950 लाख कर्नाटकातील हावेरी येथील शिगगाव येथे कुलकर्णी कुटुंबात झाला. त्याकाळी पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या क्षेत्र इंजीनियरिंगमध्ये शिक्षण, टाटा कंपनीतील पहिल्या महिला अभियंता म्हणून त्या रुजू झाल्या. त्याचबरोबर त्यांनी अभियांत्रिकी शिक्षिका कन्नड आणि इंग्रजी भाषेतील प्रसिद्ध लेखिका संगणक शास्त्रज्ञाने अभियंता यासह उद्योग आणि समाज क्षेत्रात देखील उल्लेखनीय कार्य केले त्या इन्फोसिस फाउंडेशनच्या माजी अध्यक्षाही होत्या. या व अशा कित्येक गोष्टींचा उल्लेख करता येतो. ज्याद्वारे मूर्ती यांनी दाखवून दिलं की, भारतीय स्त्री तीचा पोशाख देखील न बदलता समाजात कसे बदल घडवू शकतो.

भारताने दिलेले हेलिकॉप्टर स्वत: चालवणार; मालदीवच्या संरक्षण दलाकडून स्पष्टीकरण

सुधा मूर्ती यांच्या शिक्षण, करिअर, समाजकार्य आणि वैयक्तिक आयुष्य याबद्दलच्या काही खास गोष्टी कोणत्या आहेत? पाहुयात…

त्यांची पहिली खासियत म्हणजे त्यांचं शिक्षण ज्या काळात इंजिनिअरिंग क्षेत्रात केवळ पुरूषच जात त्याकाळात त्यांनी इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग मध्ये पदवी आणि नंतर कम्प्युटर सायन्स मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं.

तसेच केवळ शिक्षणावर त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी पुण्यात टेल्को कंपनीमध्ये पहिल्या महिला अभियंता म्हणून नोकरी देखील केली. यावेळी त्यांना महिला म्हणून नोकरीवर घेतले जात नसल्याने कंपनीच्या अध्यक्षांना पत्राद्वारे लिंगभेदाची तक्रार केली. त्यानंतर ताबडतोब नोकरीवर घेण्यात आले. त्यात त्यांनी सुरूवातीला पुणे, मुंबई आणि जमशेदपूर येथे नोकरी केली.

आदित्य-तेजस त्यांना काका म्हणायचे, घरातलाच माणूस फिरला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा

कम्प्युटर सायन्स या विषयात पदवी तर शिक्षण घेतलेला असल्याने त्यांनी संगणक शास्त्रज्ञ आणि अभियंता तसेच शिक्षिका याही क्षेत्रात आपला ठसा उमटवला. याचवेळी त्यांनी कर्नाटकातील सर्व शाळांमध्ये संगणक आणि ग्रंथालय सुविधा सुरू करून एक धाडसी पाऊल उचलले.

Gauahar Khan को गुस्सा क्यों आता आहे? पापाराझींवर संतापली आणि कॅमेरासमोर नको ते बोलून बसली

तसेच मूर्ती या त्यांच्या सामाजिक कार्यासाठी आणि कन्नड आणि इंग्रजी भाषेतील साहित्यातील योगदानासाठी ओळखले जातात. त्यांच्या काही लोकप्रिय पुस्तकांची नावे सांगायची झाल्यास जुना माणूस आणि त्याचा देव, नागाचा बदला, पत्त्यांचा बंगला, गोल्डन विंग्स असलेला पक्षी, वरचा राजा यांचा उल्लेख करता येतो. त्यांच्या डॉलर बहु या मुळं कन्नड कादंबरीचे इंग्रजीत अनुवादन आणि टेलिव्हिजन मालिकेतही रूपांतर करण्यात आले. तसेच मूर्ती यांनी स्वतः पितृरूप या मराठी आणि प्रेरणा या कन्नड चित्रपटातही काम केलं आहे.

धर्मशाला कसोटीत टीम इंडियाची मोठ्या आघाडीच्या दिशेने वाटचाल, रोहित-शुभमनची दमदार शतकं

सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांनी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट ची स्थापना केली ज्यांनी आतापर्यंत पूरग्रस्त भागात हजारो घर बांधली. आतापर्यंत जवळपास 70000 ग्रंथालये उभारली, 16000 सार्वजनिक शौचालयं. त्याचबरोबर गेट्स फाउंडेशनच्या सार्वजनिक आरोग्य सेवा उपक्रमाच्या सदस्य, अनेक अनाथाश्रमांची स्थापना ग्रामीण विकासात सहभाग तसेच हार्वर्ड विद्यापीठात द मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडियाची स्थापना केली.

International Women’s Day 2024 निमित्त जागृत करू स्त्री शक्ती; तुम्हाला माहितीये महिलांचे हे विशेषाधिकार?

मूर्ती यांच्या या बहुमोल कार्यासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यात IIT कानपूरकडून डॉक्टर ऑफ सायन्सची मानद पदवी (ऑनररी कॉसा), भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री, क्रॉसवर्ड-रेमंड बुक अवॉर्ड्समध्ये लाइफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड, आरके नारायणाचा साहित्य पुरस्कार, उत्कृष्ट सामाजिक कार्यासाठी ‘ओजस्विनी’ पुरस्कार तर आता राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नियुक्ती करत महिला दिनी सुधा मूर्ती यांचा सन्मान करण्यात आला आहे.

मूर्ती यांच्या वैयक्तीक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांचे पती इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांना उद्योग क्षेत्रात पाठिंबा देऊन हातभार देखील लावण्याचा कार्य सुधा मूर्ती यांनी केलं. टेल्को इथे अभियंता असतानाच सुधा यांनी नारायण मूर्तींशी लग्न केलं त्यांना अक्षता आणि रोहन ही दोन मुलं आहेत अक्षता या तरी त्यांचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान असणारे ऋषी सूनक यांच्या पत्नी आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube