भारताने दिलेले हेलिकॉप्टर स्वत: चालवणार; मालदीवच्या संरक्षण दलाकडून स्पष्टीकरण
Maldiv : भारताने दिलेले हेलिकॉप्टर स्वतः चालवणार असल्याचे मालदीवच्या (Maldiv) सुरक्षा दलाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. भारतीय तांत्रिक तज्ज्ञही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतील, अशी माहिती मालदीव राष्ट्रीय संरक्षण दलाचे (एमएनडीएफ) कर्नल अहमद मुजुथाबा मोहम्मद (Ahmed mohammad) यांनी दिली. मालदीवमधून भारतीय सैन्य मागे घेण्याची आणि त्यांच्या जागी तांत्रिक तज्ञांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू असताना मालदीव संरक्षणदलाकडून हे विधान करण्यात आलं आहे.
राष्ट्रवादीचं विरोधाचं प्लॅनिंग, आढळरावही म्हणतात, “मी फरपटत जाणार नाही”; शिरुरचं तिकीट कुणाला?
कर्नल मुहम्मद म्हणाले, राष्ट्रपती मुहम्मद मुइज्जू यांनी निर्णय घेतला आहे की 10 मे नंतर कोणतेही विदेशी सैन्य मालदीवमध्ये राहणार नाही. गेल्या आठवड्यात भारताने सांगितले होते की, आधुनिक हेलिकॉप्टर चालवणाऱ्या तांत्रिक तज्ञांची पहिली टीम मालदीवमध्ये पोहोचली आहे. ज्या लष्करी जवानांना भारतात परतावे लागणार आहे, त्यांच्याकडून हेलिकॉप्टर चालवण्याची जबाबदारी ही टीम घेईल. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी २९ फेब्रुवारी रोजी ही माहिती दिली.
BJP ला जिंकण्याचा विश्वास नसल्यानेच ते दुसऱ्या पक्षातील नेत्यांना चोरताहेत; नाना पटोलेंची जहरी टीका
दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेच्या दोन फेऱ्यांमध्ये 10 मेपर्यंत लष्करी जवानांना माघारी घेऊन त्यांच्या जागी तांत्रिक तज्ज्ञांना मालदीवमध्ये पाठवण्याचे मान्य करण्यात आले. लष्करी जवानांच्या जागी तांत्रिक तज्ज्ञांच्या नियुक्तीची प्रक्रिया दोन टप्प्यांत पूर्ण करायची आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये मुइझू राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर भारत आणि मालदीवमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. चीनकडे झुकलेल्या मुइझ्झूने भारताला करारानुसार विविध कामांसाठी मालदीवमध्ये तैनात केलेल्या ८८ भारतीय सैनिकांना परत बोलावण्यास सांगितले आहे.
मालदीवच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भारताने मदत केली होती. त्यामध्ये सरकारने मालदीवला डॉर्नियर विमान आणि दोन हेलिकॉप्टर भेट दिले होते. त्यांच्या देखभालीसाठी तब्बल 75 भारतीय सैनिक तैनात करण्यात आले होते. या गोष्टीचा तब्बल एका दशकाहून अधिक काळ लोटला आहे. मात्र नुकत्याच पर्यटन क्षेत्र विकासावरून सुरू झालेल्या भारत मालदीव वादामुळे मालदीव सरकारने तेथील भारतीय सैन्य हटवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र मालदीवचे माजी परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी आपल्याकडे कोणतेही परदेशी सैनिक तैनात नसल्याचा दावा करत भारताची मदत आपण घेतली असल्याचं फेटाळून लावला आहे.