BJP ला जिंकण्याचा विश्वास नसल्यानेच ते दुसऱ्या पक्षातील नेत्यांना चोरताहेत; नाना पटोलेंची जहरी टीका
Nana Patole on BJP : लोकसभा निवडणूका (Lok Sabha elections) जसजशा जवळ येत आहेत, तसतसे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) घटक पक्षातील अनेक नेते भाजपची वाट धरत आहेत. काहीच दिवसांपूर्वी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आताही आणखी काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपकडून केला जातोय. दरम्यान, याच फोडाफोडीच्या राजकारणावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भारतीय जनता पक्षात आता सक्षम उमेदवार नाहीत, म्हणून ते दुसऱ्या पक्षातील नेते चोऱ्या करून व दबावाने पळवत आहेत, अशी टीका पटोलेंनी केली.
शेळकेंचा अहंकार वाढला, मावळची जनता…; रोहित पवारांची सडकून टीका
भारत जोडो न्याय यात्रेच्या तयारीसाठी प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, या बैठकीनंतर पटोले पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलातांना नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाकडे आता सक्षम उमेदवार नसल्याने ते इतर पक्षातील नेत्यांची चोरी करून व दबावाने पळवत आहेत. भाजपाचे दोन कार्यकर्ते ईडी व सीबीआयही यासाठी कामाला लागले. भाजप आता मोदी परिवार बनला असून जिंकण्याचा विश्वासही त्यांच्यात राहिलेला नाही. स्वत:ला राष्ट्रीय नेते म्हणवणाऱ्या नितीन गडकरींना उमेदवारी मिळेल की नाही, याबाबत साशंकता आहे. या राष्ट्रीय नेतृत्वाचे नाव भाजपच्या पहिल्या यादीत असायला हवे होते, पण तसे झाले नाही, असं पटोले म्हणाले. ते म्हणाले, नागपुरसाठीही काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहे व यावर्षी विजयी पताका फडकवू तसेच सांगलीची जागासुध्दा कॉंग्रेस लढणार आहे, असं पटोले म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला येणार वेग ; 40 हजार कोटींची गुंतवणूक
खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा १२ मार्च रोजी महाराष्ट्रात दाखल होणार असून या यात्रेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. ही यात्रा नंदुरबारहून महाराष्ट्रात दाखल होऊन १७ मार्चला मुंबईत समारोप होणार आहे. न्याय यात्रेची सांगता सभा मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. या सभेला इंडिया आघाडीचे नेत नेते उपस्थित राहणार असून लोकसभा निवडणुकीचा शंखनाद फुंकला जाईल, अशी माहितीही पटोलेंनी दिला.
भाजप लोकशाही नष्ट करू पाहतेय
पुढं बोलतांना पटोले म्हणाले, अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. नंदुरबार ते मुंबई या प्रवासात अनेक कार्यक्रम होतील. व त्यासाठी त्या-त्या भागातील नेत्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्यासाठी परवानगी मागितली आहे. शिवाजी पार्क मिळेल अशी अपेक्षा असून राज्य सरकार यात राजकारण करणार नाही, अशी आमची अपेक्षा आहे. भारत जोडो न्याय यात्रा छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या भूमीवर येत आहोत. केंद्र व राज्यातील भाजप सरकार या महापुरुषांचे विचार नष्ट करण्याचे काम करत आहे. भाजप लोकशाही आणि राज्यघटना नष्ट करू पाहत आहे पण आमची त्यांना जशास तसं उत्तर देण्याची तयारी आहे.